लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी वर्धा न.प.च्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान शहरातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. शिवाय स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते बजाज पुतळा चौक पर्यंत मानवीश्रृंखला तयार करून प्लॉस्टिकमुक्त वर्धा शहराचा संकल्प करण्यात आला.प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचा वापर टाळावा. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. शिवाय प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पर्यावरणासाठी धोक्याचा असल्याने कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर नागरिकांनी करावा, असे याप्रसंगी पटवून देण्यात आले. सदर कार्यक्रमाला नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, न.प.चे मुख्याधिकारी प्रदीप जगताप, न.प.चे प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, आरोग्य विभागाचे अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, स्वप्नील खंडारे, पूजा पत्रे आदींची उपस्थिती होती. या उपक्रमात न.प. शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
मानवीश्रृंखलेतून प्लॉस्टिकमुक्त वर्धाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 6:00 AM
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी वर्धा न.प.च्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान शहरातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. शिवाय स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते बजाज पुतळा चौक पर्यंत मानवीश्रृंखला तयार करून प्लॉस्टिकमुक्त वर्धा शहराचा संकल्प करण्यात आला.
ठळक मुद्देशहरातून काढली जनजागृतीपर रॅली : नगरपरिषदेचा उपक्रम