शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

काँग्रेसच्या सद्भावना भवनाची जप्ती टळली

By admin | Published: March 21, 2017 1:15 AM

जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्यालय असलेल्या सद्भावना भवनावर पालिकेच्या मालमत्ता करापोटी तब्बल २ लाख ५० हजार रुपये थकले आहे.

मालमत्ता कराचे २.५० लाख थकले : पालिकेची कारवाईवर्धा : जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्यालय असलेल्या सद्भावना भवनावर पालिकेच्या मालमत्ता करापोटी तब्बल २ लाख ५० हजार रुपये थकले आहे. या थकबाकीपोटी सोमवारी पालिकेच्या करवसुली पथकाने सद्भावना भवनाला सील ठोकण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान काँग्रेस कमिटीच्यावतीने सायंकाळपर्यंत कराची रक्कम भरण्याचे आश्वासन दिल्याने ही जप्तीची कारवाई टळली आहे. या कारवाईच्यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे स्वत: उपस्थित होत्या.थकबाकी वसुलीकरिता वर्धा पालिकेची मोहीमवर्धा : वर्धा पालिकेच्यावतीने थकीत कराची वसुली करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत थकबाकीदाराच्या घरासमोर बॅण्ड वाजविण्याचा निर्णय घेतला. यामुळे कराचा भरणा होत असल्याचे दिसत आहे. न.प.च्या मालमत्ता कराच्या वसुलीपोटी बॅचलर मार्गावर असलेल्या जिल्हा काँग्रेस कमेटीला नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्याकडे मालकत्ता कराचे २ लाख ५० हजार ७२७ रुपये थकलेले आहे. वेळोवेळी कराचा भरणा करण्यासाठी सांगितले परंतु, त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही.परिणामी, सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास न.प.मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या नेतृत्त्वात कारवाई करण्याचा निर्णय घेत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदभावना सभागृह गाठले. यावेळी थकीत असलेल्या मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी सांगण्यात आले. मालमत्ता कराचा भरणा न केल्यास आम्ही जप्तीची कारवाई करू असेही यावेळी सांगण्यात आले. त्यावर सायकाळपर्यंत कराचा भरणा पालिकेत करण्यात येईल असे सांगण्यात आल्याने जिल्हा काँग्रेस कमेटीच्या सदभावना सभागृहावरील जप्तीची कार्यवाही टळली. कर वसूली व जप्ती पथकात पालिकेचे प्रशासकीय अधिकारी अजय बागरे, अभियंता सुधीर फरसोले, रवींद्र जगताप, गजानन पेटकर, सतीश जाधव, चेतन कहाते, निखिल लोहवे, स्वप्नील खंडारे, विजय किंगावकर, दिलीप कुथे, अशोक ठाकूर, शिवाजी थोरात, मोहम्मद मुक्कीम, नाना परटक्के, एज्जाज फारुकी, अविनाश मरगडे, गायकवाड, लिलाधर निखाडे, मो. सादीक, अमोल कोडापे आदींचा सहभाग होता.वर्धा नगर पालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा वेळीच भरणा करून वर्धा नगर पालिकेला सहकार्य करावे. तसेच वर्धेच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी केले आहे.(शहर प्रतिनिधी)कराच्या वसुलीकरिता जप्त केली कार स्थानिक स्टेशनफैल येथील भरतकुमार प्रवीणकुमार पटेलिया यांच्याकडे नगर परिषदेच्या मालमत्ता कराचे ४ लाख ९५ हजार रुपये थकीत आहे. मालमत्ता कराचा भरण्यासाठी त्यांना वेळोवेळी नोटीसही बजावण्यात आली. तसेच समजही देण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने व मालमत्ता कराचा अद्यापही भरणा न करण्यात आल्याने त्यांची एम. एच. ४० टी.सी. ७५ क्रमांकाची नवीन कार जप्त करण्यात आली. शिवाय त्यांच्या मालकीच्या चार गोदामांना सील करण्यात आल्याचे पालिकेने कळविले आहे.