तळेगावात काँग्रेसने रोखला नागपूर-अमरावती महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 05:00 AM2021-10-09T05:00:00+5:302021-10-09T05:00:08+5:30
केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केल्यावर त्यांची सुटका करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या हत्याकांडाला केंद्रात सत्ता असलेले भारतीय जनता पक्षाचे दुर्लक्षित धोरण जबाबदार असून, प्रियांका गांधी यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली. याच घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश महासचिव अमर काळे यांच्या नेतृत्त्वात तळेगाव (श्या.पंत.) येथे नागपूर-अमरावती महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन करण्यात आले.
केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केल्यावर त्यांची सुटका करण्यात आली.
आंदोलनात नितीन दर्यापूरकर, पंकज वाघमारे, जितेंद्र शेटे, विशाल साबळे, त्रिलोकचंद कोहळे, सुधीर वाकुडकर, प्रतीक मुळे, तुकाराम घागरे, अमोल सुरवाडे, मुकेश कराळे, बाबाराव अवथळे, गोपाल मरस्कोल्हे, राजू चाैधरी, दिलीप राठी, ज्ञानेश्वर जमालपुरे, राहुल लाड, राहुल देशमुख, शशी कांबळी, सुरेंद्र गायकवाड, नागो खोडे, अंकुश चव्हान, सागर कळसकर, नंदू खारकर, मनिष शेकार, जमील खाँ पठान, मधुसुदन नागपुरे, राजू मोहता, किशोर खाजबागे, राजेश करोले, गोविंदा बुले, शकील बेग, रवींद्र कोहळे, पुरुषोत्तम ठाकरे, प्रशांत मुडे, केशव बानाईत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वाहतुकीला लागला ब्रेक
- प्रियांका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ तळेगाव (श्या.पंत.) येथे नागपूर-अमरावती महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे नागपूरकडून अमरावती, तर अमरावतीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक तब्बल एक तासांसाठी ठप्प झाली होती. एकूणच या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.