लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजपच्या केंद्र सरकारकडून सध्या जनहितविरोधी धोरण अवलंबले जात आहे. त्याचा निषेध करण्यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी स्थानिक सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने केली.देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. बँकींग व्यवस्था खिळखिळी झाली आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा आव भाजप सरकारकडून केल्या जात असून ही कर्जमाफी फसवी आहे. देशात सध्या मंदीचे सावट असून दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. स्त्रीयांवरील अत्याचारांच्या प्रकारात वाढ होत असतानाही त्याकडे भाजप सरकार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात वीरेंद्र जगताप, सुधीर पांगुळे, शेखर शेंडे, पवनकुमार साहू, प्रविण उपासे, हेमलता मेघे, मिलिंद मोहोड, धैर्यशिल जगताप, अरुणा धोटे, प्रविण पेठे, बाळा माऊस्कर, रामभाऊ सातव यांच्यासह काँगे्रसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप सरकारविरोधात काँग्रेसने दिले धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 6:00 AM
देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. बँकींग व्यवस्था खिळखिळी झाली आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा आव भाजप सरकारकडून केल्या जात असून ही कर्जमाफी फसवी आहे. देशात सध्या मंदीचे सावट असून दिवसेंदिवस महागाई वाढत आहे.
ठळक मुद्देगांधी पुतळा चौकात केली निदर्शने : निवेदनातून रेटल्या विविध मागण्या