सेवाग्रामात काँग्रेसचा उद्या राज्यव्यापी सत्याग्रह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 07:29 PM2020-10-30T19:29:54+5:302020-10-30T19:30:49+5:30

Farmer laws: केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोध : प्रदेशाध्यक्षांसह मंत्र्यांची राहणार उपस्थिती

Congress's statewide satyagraha in Sevagram on Friday | सेवाग्रामात काँग्रेसचा उद्या राज्यव्यापी सत्याग्रह

सेवाग्रामात काँग्रेसचा उद्या राज्यव्यापी सत्याग्रह

googlenewsNext

वर्धा : केद्र सरकारचा नवीन कृषी कायदा अर्थव्यवस्थेला विस्कळीत करणारा आणि शेतकरी विरोधी आहे. या कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त शनिवारी देशभरात सत्याग्रह केला जाणार आहे. सेवाग्रामातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आश्रमासमोरही राज्यव्यापी सत्याग्रह केला जाणार असून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील मंत्री महोदय उपस्थित राहणार आहे.


 सेवाग्राम येथील आश्रमसमोर दिवसभर हा सत्याग्रह चालणार असून यात महाराष्ट्राचे प्रभारी एस. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत,महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री सुनील केदार व आमदार रणजित कांबळे यांच्यासह स्थानिक नेते मंडळी व कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहे. शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजतापर्यंत आयोजित सत्याग्रहाची सुरुवात आश्रम परिसरात सर्व धर्म प्रार्थना आणि आश्रमात नेत्यांनी लावलेल्या वृक्षांना पाणी टाकून केली जाणार आहे. या सत्याग्रहाच्या आयोजनाची व्यवस्था करण्यासाठी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ सेवाग्रामात दाखल झाले आहे.

सत्याग्रहाच्या व्यवस्थेची तयारी जोरात सुरू असून यासाठी डोम पध्दतीचा पेंडाल टाकण्यात येत आहे.पेंडाल एल आकारात असून ३४ बाय ६५ फुट असा आहे.याची दिशा आश्रमच्या बाजूने असून यात्री निवास कडून अर्ध्या रोडवर आहे.चाळीस प्रमुख लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती मिळाली आहे.

Web Title: Congress's statewide satyagraha in Sevagram on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.