लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : संविधान व ग्रामगिताच मानवाला तारेल, असे प्रतिपादन सप्त खंजेरी वादक प्रवीण देशमुख यांनी केले. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून चिकणी येथील हनुमान मंदिर समोर प्रवीण देशमुख यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रबोधन करताना बोलत होते.राष्ट्रसंतांच्या विचारात प्रसार व प्रचार करणारे सप्त खंजिनी वादक राष्ट्रीय प्रबोधनपर प्रवीण देशमुख यांनी आपल्या प्रबोधनातून उपस्थितांना व्यसनमुक्त करण्याकरिता ग्रामगीतेचा आधार घेत व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, शेतकरी आत्महत्या, वृक्ष संवर्धन आदी विषयांवर प्रबोधन केले. आपल्याला सामाजिक बांधिलकी जोपासायची असेल तर गाव व्यसनमुक्त करणे गरजेचे आहे. भावी पिढीला योग्य दिशा देणे ही काळाची गरज आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.संविधाना विषयी बोलताना देशमुख म्हणाले, संविधान आहे; म्हणूनच लोकशाही टिकून आहे. ग्रामगीता आहे म्हणून सद्विचार आहेत. तसेच माणुसकीही कायम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आयोजन विनोद घोडे व अयुब शेख यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले होते. कार्यक्रमाला गजानन ठोंबर, शुभम किनगावकर, कोल्हे, उईके, प्रफुल्ल लुंगे, पडेगावचे उपसरपंच नरेंद्र पहाडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रवींद माणीकपुरे, नितीन भोयर, शंकर आखुड, भाष्कर काकडे, प्रदीप भोयर, मारोती कांबळे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल पारोदे, सचिन राऊत, निलेश बेलसरे, सचिन शेंडे, प्रकाश डफरे, प्रवीण डायरे, नौशाद शेख, शंकर पेंदोर, हुसेन शेख, योगेश भागवत अतुल देशमुख आदींनी सहकार्य केले.
संविधान व ग्रामगीताच मानवाला तारेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 11:31 PM
संविधान व ग्रामगिताच मानवाला तारेल, असे प्रतिपादन सप्त खंजेरी वादक प्रवीण देशमुख यांनी केले. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून चिकणी येथील हनुमान मंदिर समोर प्रवीण देशमुख यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रबोधन करताना बोलत होते.
ठळक मुद्देप्रवीण देशमुख : चिकणी येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम