लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बुद्धांचा धम्म मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान, सदाचाराची शिकवण देणारा आहे. विज्ञानावार आधारित असलेला बौद्ध धम्म मानवाला जीवन जगण्याची कला शिकवितो. संविधान आणि बौद्ध धम्म हीच भारताची जागतिक ओळख आहे. धम्माशिवाय मानवी कल्याण अशक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले.महिलाआश्रम मैदानावर रविवारी आयोजित ३२ व्या बौद्ध धम्मपरिषदेत ते बोलत होते. विचारमंचावर बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष शांतरक्षित महाथेरो येनाळा, उद्घाटक विदर्भवादी अनिल जवादे, सत्कारमूर्ती डॉ. राजाभाऊ टाकसाळे, सुहास थूल, नीरज गुजर, स्वागताध्यक्ष डी. के. पाटील, अॅड. शीतल कस्टम, राजेश ढाबरे, प्रजापाल शेंदरे, प्रा. डॉ. राजकुमार शेंडे, आर्वीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विशाल मानकर, अनुपकुमार, अविनाश पाटील, नयन सोनवणे, राजाभाऊ ढाले, डॉ. सुभाष खंडारे, प्रा. शैलेंद्र निकोसे, प्रा. बी. एस. पाटील, माजी शिक्षणाधिकारी धनराज तेलंग, शालीक मेश्राम, धर्मपाल ताकसांडे, गजानन दिघाडे, धम्म परिषदेचे आयोजक भदंत राजरत्न उपस्थित होते.दुपारी बौद्ध धम्माची वास्तविकता, आदर्श आणि आपण या विषयावर आयोजित परिसंवादात राजरत्न आंबेडकर यांनी विचार व्यक्त केले. परिसंवादात मार्गदर्शक म्हणून पुरोगामी विचारवंत सुषमा अंधारे यांनी बुद्ध व्हा शुद्ध व्हा, हा मूलमंत्र दिला. तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता अमोल मिटकरी यांनी बुद्ध, संत तुकाराम, शिवराय, फुले, शाहू आंबेडकर हे एकाच संस्कृतीचे पालक आहेत, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरूवात सकाळी धम्मध्वज ध्वजारोहण, बुद्धवंदनेने करण्यात आली. त्यानंतर डॉ. आंबेडकर विद्यालय, हिंगणघाटच्या विद्यार्थिनींनी स्वागत-अभिवादन गीत व नृत्य सादर केले. सायंकाळी डॉ. भावना ढाबरे यांचा बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक भदंत राजरत्न तर संचालन सुनील ढाले यांनी केले. मुकुंद नाखले यांनी आभार मानले. परिषदेत डॉ. राजाभाऊ टाकसाळे, सुहास थूल, नीरज गुजर यांचा सत्कार करण्यात आला. आयोजनासाठी नीरज ताकसांडे, रूपचंद जामगडे, सितम मंदरेले, किशोर कांबळे, तारांचद पाटील, सचिन थूल, बागेश्वर, रेखा सोनवणे, वंदना पाटील, हरिका ढाले, ममता निकोसे, चंद्रकला मानकर, नितीन जुमडे, मंदाकिनी जवादे आदींनी सहकार्य केले.
संविधान आणि बौद्ध धम्म हीच भारताची जागतिक ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 9:58 PM
बुद्धांचा धम्म मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान, सदाचाराची शिकवण देणारा आहे. विज्ञानावार आधारित असलेला बौद्ध धम्म मानवाला जीवन जगण्याची कला शिकवितो. संविधान आणि बौद्ध धम्म हीच भारताची जागतिक ओळख आहे. धम्माशिवाय मानवी कल्याण अशक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले.
ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : महिलाश्रम मैदानावर बौद्ध धम्म परिषद