डांबरीकरणाची प्रतीक्षा : भाविकांना मनस्तापलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : वर्धा येथून आजनसरा देवस्थानकडे जाण्याऱ्या डांबरी रस्त्याचे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून बांधकाम करण्यात आले. गत चार-पाच वर्षात या रस्त्याची कोणतीच डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले झाले. या मार्गावरील काही गावाचे सांडपाणी डांबरी रस्त्यावरून वाहत असल्याने येथे गटार साचले आहे. या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी भाविकांतून होत आहे.आजनसरा देवस्थानाकडे जाणारे भाविक अनेकदा या गटारात अडखळून पडले आहे. या मार्गावर दुचाकीने जाताना अपघात अधिक होतात. तर चारचाकी वाहने खड्ड्यात किंवा चिखलात फसल्याच्या घटना घड्ल्या आहे. त्यामुळे गावातील सांडपाण्याची योग्य व्यवस्था लावून रस्त्याची तातडीने डागडुजी करणे गरजेचे झाले आहे. टाकळी नंतर आजनसरा जवळचा नाल्यावरील पुलाची डागडुजी करण्याची मागणी आहे. या पुलाचा परिसर खचलेला आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वाराला रस्त्याचा अंदाज आला नाही तर खड्ड्यात पडून अपघात होऊ शकतो. या दुरुतीकडे दुर्लक्ष केले जाते. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी यांना ग्रामस्थ व भाविकांनी वारंवार निवेदन दिले आहे. आजनसरा देवस्थानाकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेकरिता येथील रस्त्याची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी मजबुतीकरण होण्याची गरज असताना दुर्लक्ष केल्याने रस्त्याची दैनावस्था कायम आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करताना भाविक तसेच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.
आजनसरा रस्त्याचे बांधकाम करा
By admin | Published: June 05, 2017 1:06 AM