लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील धाम नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शुक्रवारी पहाटेपासून खैरी या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. गावाकडे जाणाऱ्या पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.या पुराचा फटका प्रवासी, विद्यार्थी व व्यापाऱ्यांना बसला आहे. तसेच आजारी व्यक्ती आणि अन्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी अन्यत्र जाणे शक्य झालेले नाही.खैरीला जाण्यायेण्यासाठी हा एकच पूल आहे. त्याची उंची कमी असल्याने दरवर्षी येथे पाणी साठून संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण होते. या पुलाची उंची वाढवावी अशी गेल्या २० वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने लक्ष न दिल्याने हा त्रास दरवर्षी गावकºयांना सहन करावा लागतो आहे.
वर्धा जिल्ह्यातील खैरी गावाचा संपर्क तुटला; धाम नदीला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:37 AM
वर्धा जिल्ह्यातील धाम नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शुक्रवारी पहाटेपासून खैरी या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.
ठळक मुद्देवीस वर्षांपासूनची मागणी