लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : भरधाव कंटेनरने इंधन संपल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री उशीरा झाला. सदर अपघात इतका भीषण होता की जखमी कंटेनरचालक चेंदामेंदा झालेल्या वाहनात अडकला होता. शर्तीच्या प्रयत्नाअंती त्याला अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, एम. पी. २२ एम. १८८५ क्रमांकाचा ट्रक इंधन संपल्याने तो पी.व्ही. टेक्सटाईल्स जवळ रस्त्याच्या कडेला उभा होता. अशातच भरधाव असलेल्या पी.बी. १३ ए.आर. ८७३४ क्रमांकाच्या कंटेनरने उभ्या ट्रकला धडक दिली. यात कंटेनरचालक गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत कंटेनरच्या कॅबीनमध्ये अडकलेल्या जखमीला शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढले. शिवाय रुग्णालयाकडे रवाना केले. माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र जाम येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, नरेंद्र दिघडे, बंडू डडमल, किशोर येळणे, दिनेश धवने, पंकज वैद्य, दिलीप वांदीले यांनी घटनास्थळ गाठून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.तर समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.
कंटेनरची ट्रकला धडक; एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:36 PM
भरधाव कंटेनरने इंधन संपल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री उशीरा झाला. सदर अपघात इतका भीषण होता की जखमी कंटेनरचालक चेंदामेंदा झालेल्या वाहनात अडकला होता. शर्तीच्या प्रयत्नाअंती त्याला अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले.
ठळक मुद्देवाहनांचेही नुकसान : शर्थीच्या प्रयत्नांती जखमीला काढले बाहेर