लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात विविध प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाºयांचे आदोलन सुरूच होते. यात मंगळवारपासून त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी संपाच्या पहिल्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी जि.प. कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाºयांना सादर करण्यात आले.सदर कंत्राटी कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून जि.प. समोर धरणे आंदोलन केले होते. आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांनी दिलेल्या आश्वासनावर सदर आंदोलन स्थगित केले होते; पण अद्याप निर्णय झाला नसल्याने पुन्हा त्यांच्यावतीने एकदा प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेत बिनशर्त समायोजन करावे, तोपर्यंत समान काम समान वेतन द्यावे, आशांना एकत्रित मासिक मानधन द्यावे, त्यांना सध्या मिळणारे मानधन दुप्पट करावे, आशा गटप्रवर्तक यांना २५ दिवसाच्या कामावर आधारीत मोबदला न देता त्यांनाही एकत्रित मासिक मानधन देण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनकर्त्यांनी रेटून लावल्या होत्या.आंदोलनाचे नेतृत्त्व संघटनेच्या अध्यक्ष अन्नपूर्णा ढोबळे, उपाध्यक्ष किरण वैरागडे, सचिव विलास तिजारे यांनी केले. आंदोलनात शमा खान, दीपाली चांडोळे, अश्विनी मेंढे, राहूल भिवगडे, अनुजा बारापात्रे, शारदा शिरसाट, राहूल बटाले, शितल गावंडे, तौफिक शेख, पंकज वाघमारे आदी सहभागी झाले होते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:42 AM
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात विविध प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाºयांचे आदोलन सुरूच होते. यात मंगळवारपासून त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
ठळक मुद्देमिनी मंत्रालयासमोर दिले धरणे : विविध मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना सादर