लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वेतनवाढीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जि.प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सदर आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी त्याच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले.आपण दिलेल्या माहे जुलै २०१९ मधील पद भरतीच्या जाहीराती नूसार कंत्राटी कर्मचारी यांचे बेसीक वेतन विविध पदानुसार वाढवून दिले आहे पैकी तालुकास्तरावरील पदाचे वेतन १७ करणेत आलेले आहे; पण सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी यांच्या पगारवाढी बद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्व कर्मचारी यांच्या पगारामध्ये अनुभवानूसार दरवर्षी १० टक्के प्रमाणे वाढ करण्यात यावी. अभ्यास समितीच्या सभेमध्ये ठरल्या प्रमाणे कंत्राटी कर्मचारी यांना एकुण गुणाच्या ३ ते ३० टक्के असा इतिवृत्तामध्ये बदल करून त्याचा त्वरीत शासन निर्णय काढण्यात यावा. सद्या होवू घातलेली मेगा भरतीस स्थगीत करून एन.एच.एम.मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे सरळ सेवेत समायोजन करणेसाठी इतर राज्याप्रमाणे निर्णय घेण्यात यावा. चंद्रपूर, गोंदीया, नंदूरबार, जळगाव व इतर जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अधिनस्त एन. एच. एम. कंत्राटी कर्मचारी यांना ३० सप्टेंबरला कार्यमुक्त न करता त्यांचे इतरत्र समायोजन करणेचा नवीन आदेश काढण्यात यावे.राज्यामधील सर्व तालुक्यात एम.अॅण्ड ई. हे पद मंजूर झालेले आहे तरी सद्यस्थितीत तालुका कार्यालयाकडील कार्यरत कार्यक्रम सहाय्यक/डि ई ओ यांना १० वर्षाचा अनुभव आहे तरी करीअर पाथच्या पत्रानुसार त्यांना एम.अॅण्ड ई पदी नेमणूक देण्यात यावी, आदी मागण्या यावेळी रेटण्यात आल्या आहेत. आंदोलनाचे नेतृत्त्व अन्नपूर्णा ढोबळे यांनी केले.
वेतनवाढीच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 6:00 AM
आपण दिलेल्या माहे जुलै २०१९ मधील पद भरतीच्या जाहीराती नूसार कंत्राटी कर्मचारी यांचे बेसीक वेतन विविध पदानुसार वाढवून दिले आहे पैकी तालुकास्तरावरील पदाचे वेतन १७ करणेत आलेले आहे; पण सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी यांच्या पगारवाढी बद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन : जि.प. कार्यालयासमोर दिले धरणे