शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

न.प.च्या ठरावाला कंत्राटदाराचा विरोध

By admin | Published: May 09, 2017 1:01 AM

ई-निविदेच्या माध्यमातून दिलेले पहिले मंजूर केलेले काम पालिकेने एका ठरावाने रद्द केले.

आज सुनावणी : जिल्हाधिकाऱ्यांकडे कलम ३०८ नुसार तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : ई-निविदेच्या माध्यमातून दिलेले पहिले मंजूर केलेले काम पालिकेने एका ठरावाने रद्द केले. यामुळे सदर कंत्राटदाराने या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. या तक्रारीवरून मंगळवारी सुनावणी होणार असून येथील नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्यासंदर्भात नोटीसी बजावल्या आहेत. येथील नगर परिषदेने कंत्राटदार धर्मेंद्र बडवाईक यांना प्रभाग क्र. ३ मधील देवस्थळे ते कासांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे काम दिले होते. याच कंत्राटदाराकडे पळसगाव मार्गावरील स्मशानभूमिच्या सौंदर्यीकरणाचे असलेले काम विहित मुदतीत पूर्ण केले नसल्याचा ठपका ठेवत दिलेले काम सर्वानुमते ठराव घेवून रद्द केले. यामुळे ठेकेदाराने महाराष्ट्र न.प. कायदा १९६५ च्या कलम ३०८ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. न.प. सिंदी मध्ये कंत्राटदार म्हणून धर्मेंद्र बडवाईक याची ई-निविदा सर्वात कमी दराची असल्याने त्यांना काम देण्यात आले. मात्र काही काळातच हा कंत्राट रद्द केला. असे अनेक आरोप या कंत्राटदाराने तक्रारीत केले आहे. या तक्रारीत ठेकेदाराने त्याच्यावर ठेवलेल्या ठपक्यांचे खंडण केले. काम करण्याच्या काळात रेतीचे घाट बंद असल्या कारणाने सदर कामाची मुदत वाढवून देण्याची मागणी ठेकेदाराने केली होती. सदरअर्जाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही. कामास विलंब होत असल्याबाबतचा एकही नोटीस न.प. च्या वतीने कंत्राटदारास बजविण्यात आली नसल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. शिवाय तारखेत खोडतोड केल्यामुळे पालिका संहितेनुसार चौकशी करून खोडतोड करणाऱ्या कर्मचाऱ्याविरूद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. दरम्यान ८ मार्च २०१७ रोजीच्या सर्व साधारण सभेमध्ये पालिकेत कार्यरत कंत्राटी अभियंता विजय बकाने हे आपले काम वेळेत करीत नसून त्यांचे काम असमाधानकारक असल्याने कंत्राटदारास दिलेल्या कामास बकाने यांच्या कार्यपद्धतीमुळे विलंब होत असल्याचाही आरोप करण्यात करण्यात आला. यामुळे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम काढून दुसरे कंत्राटी अभियंता राजेश झाडे यांच्याकडे सोपविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. कंत्राटदारास देण्यात आलेल्या अध्यक्षाच्या स्वाक्षरीने ठराव क्र. ८ मध्ये नमुद मजकूर आणि ठराव रजिस्टरमध्ये नमुद मजकूरात तफावात आहे. यामुळे नेमका ठराव कोणता ग्राह्य धरण्यात यावा असा प्रश्न निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावणीकडे लक्षकाम रद्द करण्याच्या ठरावावरून सिंदी (रेल्वे) नगर परिषद आणि कंत्राटदारात चांगलाच वाद झाला. या वादातून कंंत्राटदाराने त्याची तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या वादावर चौकशी सुरू झाली असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय निष्पन्न होते याकडे सिंदी येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या शहरात नगर परिषद आणि नागरिकांत नेहमीच वाद होत असल्याची चर्चा आहे. पालिकेनी दिलेले कामे प्रत्येक ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे. कामात प्रामाणिकपणा असावा. पालिकेला आलेल्या निधीचा योग्य पद्धतीने उपयोग व्हावा, ठेकेदाराला कामात विलंब होत असल्याच्या वारंवार नोटीसाद्वारे कळविण्यात आले होते. कामात विलंब होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. विचार करून त्यानंतरही त्या ठेकेदाराला न.प. तर्फे काम देण्यात आले आहे. घेतलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. - संगीता शेंडे, नगराध्यक्ष, सिंदी (रेल्वे)