दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : कस्तुरबा गांधी (बा.) यांची १५० वी जयंती गुरूवार ११ एप्रिलला संपूर्ण देशात साजरी करण्यात येणार आहे. कस्तुरबा या बापूपेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत बापू यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.स्वातंत्र्य चळवळीत बापूंचा फार मोठा वाटा आहे; पण बापूंच्या जडण घडणीत ‘बा’ कस्तुरबा यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या सार्वजनिक कार्याची सुरुवात महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमधून केली. तेथील महिला आंदोलच्या जागृतीसाठी कस्तुरबा यांनी बापूंच्या खांद्याला खांदा लावून काम केले. फिनिक्स आश्रमात सर्व आश्रमवासीयांचा स्वयंपाक एकत्र होत असे. स्वयंपाकगृहात एकदा कस्तुरबा चपाती लाटत होत्या. गांधी खाली बसून पोळ्या भाजत होते. रावजीभाई, मणीभाई पटेल भाजी चिरत होते. काम करत करत कस्तुरबा आणि गांधीजी यांची दक्षिण आफ्रिकेतील सरकारच्या जुलमी कायद्याबद्दल चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी बापूंच्या कार्यात खांद्याला खांदा लावून सहकार्य केले. कस्तुरबा सत्याग्रहाच्या चार तासांपूर्वीच पकडल्या गेल्या. शिवाय बापूंसोबत आंगाखान पॅलेसच्या नजरकैद्येत ठेवल्या गेल्या. तेथेच २२ फेब्रुवारी १९४४ कस्तुरबाने अखेरचा श्वास घेतला. जेलमध्ये मरणाऱ्या कस्तुरबा बापूंनी म्हटल्याप्रमाणे जगदंबा झाल्या. कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन सेवाग्राम येथील गांधी आश्रमात करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून कस्तुरबा गांधी यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
‘कस्तुरबा’ यांचे स्वातंत्र्यचळवळीत मोलाचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:00 PM
कस्तुरबा गांधी (बा.) यांची १५० वी जयंती गुरूवार ११ एप्रिलला संपूर्ण देशात साजरी करण्यात येणार आहे. कस्तुरबा या बापूपेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत बापू यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.
ठळक मुद्देदिनविशेष : ‘बा’ यांची १५० वी जयंती