वातावरण कलुषित : खोट्या तक्रारीद्वारे केले होते ३० जणांवर गुन्हे दाखलआष्टी (श.) : अंतोरा गावात अंतर्गत राजकारणामुळे कलह निर्माण झाला आहे. दारूबंदी अध्यक्षाच्या मताने गावातील ३० जणांवर गुन्हे दाखल केले होते. ग्रा.पं. निवडणुकीदरम्यान घडलेल्या या प्रकाराची धग कायम असून गावात तणाव आहे. गावातील राजकारणी, धनिक व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून भाजपाच्या ३० जणांवर ग्रा.पं. निवडणूक काळात गुन्हे दाखल केले. यातून गावाची शांतता भंग केली जात आहे. दारूबंदी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र देशमुख व काही लोक हा प्रकार घडवून आणत असल्याचा आरोप राजेश ठाकरे यांनी केला आहे. खोट्या तक्रारी करून गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणाची चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे यांनी निवेदनातून केली.(प्रतिनिधी)
राजकारणातून अंतोरा गावात कलह
By admin | Published: September 21, 2015 1:58 AM