शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

लग्नानंतर अवघ्या पाच दिवसात नवरदेवाला झाला कोरोना; त्याच्या संपर्कातील चारजणही पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 6:01 PM

३० जून रोजी या नवरदेवाचे लग्न झाले होते. नंतर पाचच दिवसांनी त्याला कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल तर त्याच्यासोबत असलेल्या चारही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्देवर्धा शहरासह लगतच्या नऊ ग्रा.पं.परिसरात सक्तीची संचारबंदीविनाकारण फिरणाऱ्यास होणार दंड१२ चमू करणार प्रभावी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: पिपरी (मेघे) येथील नवविवाहित तरुणाच्या निकट संपर्कातील व्यक्तींपैकी चार व्यक्तींचे कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी वर्धा शहरासह वर्धा शहराशेजारील नऊ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित केला आहे. या आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण १२ चमू विशेष प्रयत्न करणार असून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.३० जून रोजी या नवरदेवाचे लग्न झाले होते. नंतर पाचच दिवसांनी त्याला कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल तर त्याच्यासोबत असलेल्या चारही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.वर्धा उपविभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वर्धा शहर आणि शहराला लागून असलेल्या नऊ ग्रामपंचायतमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवार १३ जुलै रात्री ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय वर्धा शहरासह शहराशेजारील रहिवासी असलेल्या नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे. संचार बंदीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सेवाग्राम, सावंगी (मेघे), रामनगर, वर्धा शहर या चार पोलीस स्टेशन मधील ठाणेदारांच्या नेतृत्त्वातील प्रत्येकी एक चमू, गटविकास अधिकारी स्वाती इसाये यांच्या नेतृत्त्वातील दोन चमू, महसूल विभागाच्या तीन चमू तसेच वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्या नेतृत्त्वातील तीन चमू विशेष प्रयत्न करणार आहेत.मोजकीच सेवा राहणार सुरूउपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांच्या आदेशानुसार बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), नालवाडी, आलोडी, म्हसाळा, साटोडा, पिपरी (मेघे), उमरी (मेघे) या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पुढील तीन दिवस केवळ औषधी दुकाने, दवाखाने, दूध, वर्तमान पत्र वाटप, अत्यावश्यक शासकीय कार्यालय सुरू राहणार आहेत.सध्याच्या कोरोना संकटात यापूर्वी वर्धेकरांनी जिल्हा प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १३ जुलैपर्यंत वर्धा शहरासह शहराशेजारील नऊ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रासाठी सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. स्वत: कोरोनामुक्त राहण्यासाठी पुढील तीन दिवस नागरिकांनी घरातच रहावे. तसेच जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस