वर्धा: विलगीकरणातील व्यक्तीमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून आज मुंबईच्या नर्ससह तिघांची भर पडल्याने संख्या १६ वर पोहोचली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात नवे रुग्ण आढळून येत आहे.
आजच्या तपासणीत सायन भागातील खाजगी दवाखान्यात काम करणारी व वर्धेलगत सावंगी येथे राहणारी नर्स कोरोना रुग्ण निघाली. तिला सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मुंबईतील चेंबूर परिसरातील एक दाम्पत्य कोरोना बाधित असल्याचा अहवाल आहे. हिंगणघाट तालुक्यातील शिरूडच्या या दाम्पत्याचा मुलाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. १६ मे रोजी ते वर्धेत आल्यानंतर त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले.
वर्धेतील चार पैकी एकाचा मृत्यू असून धामणगाव चार, गोरखपूर एक,वाशीम एक,नवी मुंबई तीन असे आजच्या सह रुग्ण संख्या सोळा वर पोहचली. सोमवारी वर्धेतील व्यक्ती सिकंदराबाद येथे कोरोना बाधित निघाल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबातील 15 सदस्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. तसेच, हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून त्यात आमदार निवास सुद्धा आल्याने चर्चेला पेव फुटले आहे.