शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

Coronavirus in Wardha; नागपूर जायचेय आठ हजार द्या... चंद्रपूर जायचे असेल तर १२ हजार मोजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 5:26 PM

Coronavirus in Wardha वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेकडून रुग्णांच्या नातेवाइकांची लूट सुरू आहे.

ठळक मुद्देखासगी रुग्णवाहिकेकडून लूट

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेकडून रुग्णांच्या नातेवाइकांची लूट सुरू आहे. नागपूरला रुग्ण घेऊन जायचे असल्यास आठ हजार रुपये, तर चंद्रपूर येथे जायचे असल्यास १२ हजार रुपये अधिकचे भाडे आकारण्यात येत असून रुग्णांच्या नातलगांची एकप्रकारे लूट सुरू आहे. मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी कुटुंबीय व नातेवाइकांकडून खासगी रुग्णवाहिकाचालक तासाला अव्वाच्या सवा पैसे घेत आहेत. इतकेच नव्हेतर रुग्णांना बाहेर जिल्ह्यातील रुग्णालयांत नेण्यासाठीही अधिकचे भाडे आकारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. एका रुग्णाला वर्ध्याहून नागपूरच्या रुग्णालयात नेण्यासाठी चक्का खासगी रुग्णवाहिकाचालकाने आठ हजार रुपये भाडे आकारले तर हिंगणघाट येथून चंद्रपूरला जाण्यासाठी तब्बल १२ ते १४ हजार रुपये आकारण्यात आल्याने रुग्णांच्या नातलगांची चांगलीच लूट होत आहे. हे म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. यामुळे खासगी तसेच कोरोना सेंटर हाऊसफुल्ल झाली आहे. शिवाय घरी उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सेवा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेच्या शोधात रुग्णांच्या नातेवाइकांना फिरावे लागते. उपप्रादेशिक परिवहन विभागाने दर ठरवून दिलेले असताना रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकेच्या चालक मालकांकडून लुटले जात आहे. खासगी रुग्णवाहिका सेवेच्या नावाखाली व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजन सेवा असलेली रुग्णवाहिका मिळणे हे भाग्य असल्याचे समजून रुग्णांचे नातेवाईक रुग्णवाहिका चालकाचे भाडे आकारणी करेल तेवढे देत आहे. याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष दिल्यास नागरिकांना लुटणाऱ्या खासगी रुग्णवाहिकेचे चालक मालक सुतासारखे सरळ होतील.

सेवा भाव गेला कुठे ?

खासगी रुग्णालयांसह विविध संस्था, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या धंद्यात शिरकाव केला आहे. त्यांच्यात कमाईसाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे या सेवेचे बाजारीकरण झाले आहे. याचा फटका मात्र, आधीच रुग्णांच्या आजारपणामुळे हतबल झालेल्या रुग्णांच्या नातलगांना बसत असून, सेवा भाव गेला कुठे, अशी म्हणण्याची वेळ या संकट काळात आली आहे.

जिल्ह्यात १०७ रुग्णवाहिकांची नोंद

वर्धा जिल्ह्यात एकूण १०७ रुग्णवाहिका आहे या रुग्णवाहिकांची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात शेकडो खासगी रुग्णवाहिका जिल्हाभर धावताना दिसतात. बहुतांश खासगी रुग्णालयाकडे स्वत:ची खासगी रुग्णवाहिका आहे. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका खासगी रुग्णालयात रुग्णांना नेत नाहीत. मात्र, अनेकवेळा गंभीर रुग्णाला खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये नेणे गरजेचे असते. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकेचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेचा चालक वाटेल तेवढे पैसे घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांची लूट करीत आहेत.

अनेक रुग्णवाहिकांची नोंदीकडे पाठ

रुग्णवाहिका घेतल्यानंतर तिची पासिंग होतानाच रुग्णवाहिका म्हणून आरटीओ कार्यालयात नोंद होते. मात्र, काही जणांनी आधी व्हॅनसारखी वाहने घेतली आहेत. नंतर पुढे त्यांना रुग्णवाहिका करून व्यवसाय सुरू केला आहे. त्यांची वाहन म्हणून नोंदणी असली तर रुग्णवाहिका म्हणून नोंद नाही. अशा अनेक रुग्णवाहिका जिल्ह्यात धावत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे रुग्णवाहिका असल्याने त्यांना रस्त्यावर तपासलेही जात नाही. याचाच फायदा ते घेत आहे.

बेदरकारपणे चालविणे झाले धोक्याचे

एका खासगी रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णवाहिका बेदरकारपणे चालविल्याने रविवारी ठाकरे मार्केट परिसरात रुग्णवाहिका रस्तादुभाजकावरील मातीत फसली. दरम्यान, रुग्णवाहिकेतील कुणालाही इजा झाली नाही. वास्तविक रुग्णाला सुस्थितीत रुग्णालयात पोहोचविणे रुग्णवाहिका चालकाचे काम असते. करकचून ब्रेक मारणे, खड्ड्यातून वेगात नेणे, अशा प्रकारामुळे रुग्णाला त्रास होतो. मात्र, एखाद्या रुग्णाला दवाखान्यात सोडत असताना दुसऱ्या रुग्णांसाठी फोन आलाच तर पहिल्या रुग्णाला दवाखान्यात पोहोचविण्यासाठी वाहनचालकाला घाई सुटते.

...............

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस