शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

कोरोनोचा वर्धा पॅटर्न राज्यासाठी मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 2:05 PM

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्याठी काम केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना या राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा

प्राजक्त तनपुरेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्याठी काम केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना या राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. वर्धा जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी जिल्ह्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असून आणखी चांगले प्रयत्न करून कोरोनाचा प्रसार रोखावा अशा सूचना नगर विकास, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला आ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.वर्धा जिल्ह्याचा कोविड संदर्भात आढावा घेताना ना. तनपुरे यांनी सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही अ‍ॅक्टिव्ह रुग्ण नसल्याबाबत समाधान व्यक्त केले. बाहेर जिल्ह्यातून येणाºया जीवनावश्यक व इतर वस्तूच्या वाहनासोबत येणाऱ्या व्यक्ती जिल्ह्यातील स्थानिकांसोबत मिसळणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्याने राबवलेले अनलोडिंग वाहनतळ हे इतर जिल्ह्यांसाठीही मार्गदर्शक आहे. शिवाय इतर जिल्हा व राज्यातून येणाºया व्यक्तींसोबतच संपूर्ण घर विलगिकरण करण्याचा निर्णयही चांगला आहे. यामुळे कोरोनाला थांबविण्यास ९० टक्के आळा बसेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केले. खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बियाणे आणि खतांची टंचाई होणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांचा कापूस तात्काळ विकला जाईल यासाठी प्रभावी नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही ना. तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस