लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमावर आधारित डॉ. मंजूषा संजय स्वामी लिखित पाठ्यपुस्तक सप्तरंग या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यात आला आहे. पण पुस्तकात महाराजांची जन्म तारीख १९ फेब्रुवारी १६२७ अशी चुकीची नोंदविण्यात आली आहे. ती दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने केली आहे. शिवाजी महाराजांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला आहे तसेच या पुस्तकात २० व्या वर्षी सर्वांत प्रथम सेनेसह तोरणागडावर चढाई करून गड काबीज केला, असे सांगण्यात आले आहे. मात्र, शिवाजी महाराजांनी १६४६ मध्ये म्हणजेच वयाच्या केवळ १६ व्या वर्षी हा किल्ला काबीज केला होता. शासन, इतिहासकारांनी तसेच अनेक अभ्यासकांनी शिवाजी महाराजांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६३० असल्याचे मान्य केले असल्याने पाठ्यपुस्तकातून हीच तारीख दर्शविणे अपेक्षित आहे. मात्र चुकीची तारीख दर्शवून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. लहान मुलांना त्यामुळे चुकीचा इतिहास शिकविला जाणार आहे. ही बाब नियमबाह्य व खोडसाळपणाची असल्याने ती त्वरित थांबविण्यात यावी. लेखक, प्रकाशक, धड्यास मान्यता देणारे तज्ज्ञ यांच्यावर कारवाई करून प्रकरण तत्काळ रद्द करून सुधारित स्वरूपात नव्याने छपाई करण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वारंवार अशा चुकीच्या घटना घडत असल्याने त्या जाणीवपूर्वक घडविल्या जात आहे, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. निवेदनाचा तातडीने विचार करून दुरूस्ती करण्यात यावी; अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष नीरज बुटे, जिल्हा संघटक शंतनू भोयर, शहर अध्यक्ष धीरज चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष अमोल थोटे, शहर संघटक विशाल शिरभाते, यश माहेश्वरी व पदाधिकाऱ्यांनी दीला
पुस्तकातील ‘ती’ चूक दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:45 PM
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमावर आधारित डॉ. मंजूषा संजय स्वामी लिखित पाठ्यपुस्तक सप्तरंग या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यात आला आहे. पण पुस्तकात महाराजांची जन्म तारीख १९ फेब्रुवारी १६२७ अशी चुकीची नोंदविण्यात आली आहे. ती दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने केली आहे.
ठळक मुद्देवीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची मागणी : जिल्हा प्रशासनाला निवेदन