वर्धा : यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांच्या माथी आलेल्या नापिकीने त्याला चांगलेच जेरीस आणले. यात येथील एका शेतकऱ्याने पाच एकरात ४२ हजार ३५० रुपये खर्च करून सोयाबीनचा पेरा केला. या पाच एकरात त्याला केवळ चार हजार ३५० रुपयांचे उत्पन्न झाले. या उत्पन्नात घेतलेले कर्ज फेडावे वा इतर खर्च करावा असा प्रश्न त्याला पडला आहे. ही अवस्था जिल्ह्यात एका शेतकऱ्याची नाही अनेक शेतकऱ्यांनी आहे. वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) येथील शंकर श्यामराव टोपले यांनी आलोडा (बोरगाव) शिवारातील त्यांच्या शेतात सोयाबीनवा पेरा केला. त्याच्याकडे ५ एकर शेती आहे. त्यांनी मशागतीपासून तर उत्पादन घरात येईपर्यंत ४२ हजार ३५० रुपये खर्च केला. तेव्हा त्याच्या घरात केवळ ४ हजार ५०० रुपये सोयाबीन झाले. जिल्ह्यात उत्पादनात प्रचंड तोटा येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे संबंधित विभागाने अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना नुकसान भरपाई तसेच कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत आहे.कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जात होते. मात्र निसर्गाच्या अवकृपेने ती परिस्थिती येता उलट झाली आहे. शेंगा भरण्याच्या काळात पावसाने दांडी मारल्याने सोयाबीनच्या दाण्याला ज्वारीच्या दाण्याचा आकार आला आहे. बँकाचे कर्ज काढून घेतलेल्या सोयाबीनच्या उत्पन्नात आलेला तोटा हा शेतकऱ्यांना आणखीच अडचणीत आणणारा आहे. पूर्वी शेतकरी सोयाबीनचे उत्पन्न घेत होता. तणनाशक उपलब्ध नसतानाही हजारो रुपये निंदन व डवरणीसाठी खर्च करूनही किमान एकरी ८ ते १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न निघत होते. एकरी उत्पादन खर्च २० हजाराच्य जवळपास गेल्यास ४० हजारांपर्यंत उत्पादन होत. मात्र यंदाच्या हंगामात विपरीतच झाले.(तालुका प्रतिनिधी)पाच एकराला लागलेला खर्चनागरणी३ हजार २०० रुपयेवखरणी२ हजार ९०० रुपयेवेचाई१ हजार ७०० रुपयेबियाणे (५ बॅग)१३ हजार ५०० रुपयेखत५ हजार १२० रुपयेपेरणी१ हजार ८०० रुपयेफवारा ४०० रुपयेतननाशक१ हजार ६३० रुपयेडवरणी३ हजार ६०० रुपयेकिटकनाशक१ हजार ७०० रुपयेफवारणी४०० रुपयेसवंगणी६ हजार रुपयेमळणी४०० रुपयेएकूण४२ हजार ३५०
खर्च ४२ हजार ३५० आणि उत्पन्न ४ हजार ५०० रुपयेच
By admin | Published: December 29, 2014 2:00 AM