लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकºयांचे मुख्य पीक म्हणून कापसाची ओळख आहे. शेतकºयांच्या या पांढºया सोन्याबाबत शासन नेहमीच उदासिन असल्याने आज कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. दराबाबत शासनाची असलेली उदासिनता व इतर देशांप्रमाणे नसलेल्या अनुदानामुळे कापूस उत्पादक चांगलाच अडचणीत आला. यात आणखी अडचण म्हणून वेचणीचा वाढता खर्च कापूस उत्पादकांची कंबर मोडणारा ठरत आहे. मजुरांनी कापूस वेचणीच्या मजुरीच्या पद्धतीत बदल केला आहे. या प्रकारामुळे कापूस उत्पादकांवर भुर्दंड वाढत आहे. या भुर्दंडापोटी शेतकºयांची कंबर मोडल्याचे दिसत आहे. वाढती मजुरी आणि मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे शेतातून कापूस काढावा अथवा नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. या मजुरीत पूर्वी वजनाची तर आता रोजीची पद्धत आली आहे. यामुळे शेतकºयाची चांगलीच कंबर मोडली आहे. यातही मजुरांना रोख मजुरी देण्यात येत असल्याने त्याची व्यवस्था शेतकºयांना पहिले करावी लागते. यात यंदा कृषी कर्जाची उचल झाली नसल्याने मजुरीची रक्कम देण्याकरिता शेतकºयांना सावकाराची पायरी चढावी लागल्याचे वास्तव आहे. यामळे यंदाचा खरीप शेतकºयांकरिता तोट्याचा आणि त्रासाचाच असल्याचे दिसून आले आहे.कापूस वेचणी ८ ते १० रुपये किलोगौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (निपाणी) : शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाची आवक बाजारात सुरू झाली आहे. हेच पांढरे सोने शेतातून बाजारात आणताना मात्र शेतकºयाची चांगलीच कंबर मोडत असल्याचे दिसून आले आहे. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने आठ ते दहा रुपये प्रति किलो प्रमाणे दर द्यावे लागत आहे. यामुळे मजुरांचे सुगीचे दिवस असले तरी शेतकºयांचे मात्र दिवाळे निघाले आहे.वर्धा तालुक्यात जवळपास ६५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणत आहेत. हा कापूस व्यापारी मागेल त्या भावात शेतकºयांना कापूस विकावा लागत आहे. शेतकºयांचा कापूस उभ्या गाडीला भाव देतात व खाली टाकल्यानंतर वेगळा भाव दिल्या जात आहे. यात शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात त्रासही होत आहे. कापूस लागवडीपासून ते वेचणी करून घरात आणेपर्यंत शेतकºयांना पैसा ओतावा लागतो. मात्र बाजारात बेभाव विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक झळ सहन करावी लागत असून शेतकºयांचे दिवाळे निघत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त या भागात शेतकºयांना आधार देण्याची गरज आहे.वेचणीकरिता करावी लागते वेगळीच कसरतकापूस शेतातून घरी आणण्याकरिता शेतकºयांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मजूर मिळविण्यापासून ते त्यांची वेचलेला कापूस घरी आणत पर्यंत शेतकºयाला मोठी कसरत करावी लागते. यातही कालानुरूप मोठमोठे बदल घडत आहेत. पूर्वी कापूस वेचणाºया महिलेला किलोनुसार मोबदला मिळत होता. यात मजूर महिला जास्तीत जास्त कापूस वेचण्याचा प्रयत्न करीत होती. आता ही पद्धत कालबाह्य झाली आहे. वजनाची पद्धत कालबाह्य झाली असून रोजंदारीची पद्धत आली आहे. या रोजंदारीत एका दिवसात ही महिला त्याच वजनाचा कापूस वेचत आहे. पूर्वी मिळणारा कापसाच्या वजनाचा मोबदला आणि आत मिळणारा रोजीच्या काळात मिळणारा मोबदला वाढला आहे. तेवढाचा कापूस वेचणाºया महिलेला सुमारे १०० रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहे. यात शेतकºयांची मोठी अडचण झाली आहे.
रोजीच्या ओझ्याने कापूस उत्पादकांची कंबरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 12:32 AM
जिल्ह्यातील शेतकºयांचे मुख्य पीक म्हणून कापसाची ओळख आहे. शेतकºयांच्या या पांढºया सोन्याबाबत शासन नेहमीच उदासिन असल्याने आज कापूस उत्पादक अडचणीत आला आहे.
ठळक मुद्देकिलोची पद्धत कालबाह्य : शेतमाल निघण्याच्या काळात आलेल्या लाल्यामुळे उत्पादनाची हमी नाही