शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:27 PM

शासनकर्ते सांगतात त्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था अजिबात सुदृढ नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय चिंताजनक असून सर्वसामान्यांवर त्याचा विपरित प्रभाव पडत आहे, असे मत अभ्यासक, शेतकरी नेते, विदर्भवादी व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवामनराव चटप : आधारवड व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

ऑनलाईन लोकमतवर्धा : शासनकर्ते सांगतात त्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था अजिबात सुदृढ नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय चिंताजनक असून सर्वसामान्यांवर त्याचा विपरित प्रभाव पडत आहे, असे मत अभ्यासक, शेतकरी नेते, विदर्भवादी व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.आधारवड ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार आणि भरत ज्ञान मंडळ, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती विद्या मंदिराच्या प्रांगणात आयोजित आधारवड व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी विचारमंचावर, आधारवडचे अध्यक्ष प्रा. शेख हाशम, सचिव चंद्रशेखर दंढारे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सर्व सेवा संघाचे प्रसादजी उपस्थित होते.यावेळी वामनराव चटप यांनी आकडेवारीतून आर्थिक स्थितीचा आढावा सादर केला. पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारी नोकरभरती बंदच आहे. रोजगाराच्या संधी सतत दडपत असून बेरोजगारी प्रचंड प्रमाणावर वाढत आहे. घाट्यातील शेती, नोकऱ्यांचा अभाव, आयात-निर्यातीचे बिघडलेले संतुलन यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी एकतर आत्महत्येचा किंवा शहराकडे पलायनाचा मार्ग स्वीकारत आहेत. परिणामी शहराची भरमसाठ वाढ होत आहे. एकट्या मुंबई शहरात लोकसंख्येच्या ५५ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत ओंगळवाणे जीवन जगण्यास बाध्य आहे. कारण शहर वाढतात त्याप्रमाणात मुलभूत सुविधा नसतात, परिणामी रोगराईचे प्रमाण वाढत आहे. भांडवलशाहीतील भोगवादी प्रवृत्तीच्या आकर्षणामुळे वहावत चाललेल्या तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे कार्य यापुढे ज्येष्ठ नागरिकांनी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विदर्भाचे नष्टचर्य संपवावयाचे असेल तर विदर्भाचे वेगळे राज्य हाच एकमेव उपाय आहे, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.कार्यक्रमाचे सुरुवातीला वामनराव चटप यांचा संस्थेच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून भरत ज्ञान मंडळीचे सदस्य अरूण काशीकर यांनी सत्कार केला.अ‍ॅड. मोहन देशमुख यांनी भारताची अर्थव्यवस्था आणि सद्यस्थिती या विषयावर भूमिका मांडली. वक्त्यांचा परिचय पांडुरंग भालशंकर यांनी दिला. सूत्रसंचालन चंद्रशेखर दंढारे यांनी केले तर जिल्हा संघटक शेखर सोळके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला श्यामकांत देशपांडे, हरीष तांदळे, माजी आमदार सरोज काशीकर, रवी काशीकर, मदन मोहता, व्ही.एम. देशमुख, पुरुषोत्तम पोफळी, गुणवंत डखरे, डॉ. एरकेवार, शेषराव बीजवार, बी.वाय. बागदरकर, अ‍ॅड. एन.जे. भोयर, अ‍ॅड. अशोक वाघ, प्रा. अनिल दुबे, संजय इंगळे तिगावकर, मनोहर पंचरिया, शेतकरी संघटना, कामगार संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, परिषद तसेच शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अप्रत्यक्ष कराचा बोजा सामान्यांवरदेशातील ७३ टक्के संपत्ती फक्त एक टक्का लोकांजवळ अर्थात कार्पोरेट घराण्यांकडे केंद्रीत झाली आहे. मात्र हा वर्ग ५० टक्के अप्रत्यक्ष करांपैकी फक्त एक टक्काच कर भरतो. देशातील ९९ टक्के लोकांच्या वाट्याला केवळ २७ टक्के संपत्ती आलेली असून ४९ टक्के अप्रत्यक्ष कराचा भार त्यांच्यावर पडत आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेचे धोरण असले तरी भारतात भांडवलवादी अर्थव्यवस्था असल्याचे चटप यांनी स्पष्ट केले.