लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : येथील आसोले नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे गत काही महिन्यांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच या सिमेंट रस्त्याला तडा गेल्याने झालेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा होताना दिसते. सदर प्रकरणी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.कष्टकऱ्यांची वसाहत म्हणून आर्वी-तळेगाव मार्गावरील आसोलेनगर परिसराची ओळख आहे. या परिसरात काही ठिकाणी सिमेंट रस्ते व पक्क्या नाल्या असल्या तरी बहूतांश ठिकाणी पक्क्या नाल्या व सिमेंट रस्ते नसल्याने तेथील रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना ये-जा करताना चिखलातूनच वाट काढावी लागत असल्याचे रहिवासी सांगतात.आसोलेनगर येथील रहिवाशांची समस्या लक्षात घेता सुमारे दीड वर्षांपूर्वी मुख्य मार्गावरून आसोलेनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. या कामासाठी मोठ्या प्रमाणात शासनाचा निधीही खर्च करण्यात आला. मात्र, अल्पावधीतच या सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी तडा गेल्याने झालेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर सिमेंट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते; पण अल्पावधीतच रस्त्याला तडा गेल्याने गुणवत्तापूर्ण काम करून घेण्याची जबाबदारी असलेल्या अधिकारी व कंत्राटदार यांच्यात काही अर्थपूर्ण व्यवहार तर झाले नाही ना, अशी चर्चाही परिसरात ठिकठिकाणी होताना दिसते.सदर प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.
अल्पावधित सिमेंट रस्त्याला तडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:49 AM
येथील आसोले नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे गत काही महिन्यांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच या सिमेंट रस्त्याला तडा गेल्याने झालेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा होताना दिसते.
ठळक मुद्देउलट-सुलट चर्चेला उधाण : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी