लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विश्वाचे स्वरूप, ग्रह, तारे, नक्षत्र राशी आदींबाबत अजूनपर्यंत आपण सज्ञान झालो नाही. यामुळे जीवनात घडणाºया बºया-वाईट घटनांचा संबंध आकाशातील ग्रहताºयांशी जोडतो व आर्थिक, शारीरिक, मानसिक फसगत करून घेतो. येणाºया पिढीला चिकित्सक आणि वैज्ञानिक बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये पालकांनी शिक्षकांनी, खगोलशास्त्राबद्दल आवड निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, असे मत महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते तथा खगोल अभ्यासक हेमंत धानोरकर अंबेजोगाई यांनी व्यक्त केले.अनेकांत स्वाध्याय मंदिरात शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त विवेक जागर दिनी आयोजित ‘ग्रहगोल, तारे; समज गैरसमज, खगोलशास्त्र, ज्योतिष्यशास्त्र संबंध’ या विषयावरील पीपीटीद्वारे व्याख्यानात ते बोलत होते. मंचावर महा. अंनिसचे तालुकाध्यक्ष अरुण चवडे, डॉ. सिद्धार्थ बुटले, स्वावलंबीचे मुख्याध्यापक मनोज मोहता, राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार उपस्थित होते. धानोरकर यांनी विश्वाचे स्वरूप याबाबत माहिती देताना पृथ्वीपासून जस-जसे दूर जाऊ, तस-तसे मानवाचे अस्तित्व संपुष्टात येते; पण माणूस आपल्याच अहंकारात वावरतो. हे बदलणे गरजेचे आहे. पोपला ४०० वर्षानंतर जे कळले ते भारतीयांना अजून कळले नाही, असा टोला मारताना विद्यार्थ्यांनी इतर भेटवस्तू न घेता टेलिस्कोप वा दूर्बिनीसाठी आपल्या पालकांकडे आग्रह धरावा, असेही सांगितले. यावेळी त्यांनी ग्रह, तारे, नक्षत्र, राशी आदींचा कोणताही परिणाम मानवी जीवनावर होत नसून आपल्या अज्ञानापोटी ज्योतिषांचा धंदा जोरात चालतो. त्यामुळे आपण चिकित्सक होणे गरजेचे आहे. खगोलशास्त्र हा विषय वैज्ञानिक दृष्टीकोन देणारा आहे; पण त्याला ज्योतिष्यशास्त्राशी जोडून वैज्ञानिक दृष्टीकोन नष्ट केला जात आहे. याबाबत सावध होऊन विवेकी बनण्याचे आवाहन त्यांनी केले. शेवटी दुर्बिनीच्या साह्याने त्यांनी चंद्रावरील खड्डे उपस्थितांना दाखविलेत.भरत कोकावार यांनी अभिवादन गीत सादर केले. प्रास्ताविक गजेंद्र सुरकार यांनी केले तर परिचय सुनील ढाले यांनी करून दिला. संचालन कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार सारिता डेहनकर यांनी मानले. कार्यक्रमाला अनिल मुर्डीव, राजेंद्र ढोबळे, पंकज इंगोले, प्रकाश जिंदे, सुनील सावध, प्रा. नूतन माळवी, अॅड. पूजा जाधव, धनंजय नाखले आदींनी सहकार्य केले.
मानवी जीवनाशी ग्रहगोलांचा संबंध जोडणे चुकीचेचमानव जसा पृथ्वीपासून दूर जातो, तसे त्याचे अस्तित्व नष्ट होते; पण मानवाचा अहंकार सुटत नाही. ग्रह, तारे, राशी आदींचा मानवी जीवनावर कधीही परिणाम होत नाही; पण खगोलशास्त्राला जोतिष्यशास्त्राशी जोडून वैज्ञानिक दृष्टीकोण नष्ट केला जात आहे. ग्रहगोलांचा संबंध मानवी जीवनाशी जोडणे चुकीचेच आहे.