लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्लास्टिकचा वापर टाळावा म्हणून देशपातळीवर जनजागृती केली जात आहे. नागरिकांना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरू नये, असे आवाहन केले जात आहे. शिवाय शासनाने तत्सम प्लास्टिक पिशव्यांवर बंदीही घातली आहे. असे असले तरी जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत आहे. वर्धा शहराच्या बायपासच्या कडेला केवळ प्लास्टिकच्या कचºयाचाच खच असून हा प्लास्टिकचा कचरा गुरांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे.शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. या प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नाही. जमिनीमध्ये कितीही वर्षे पुरवून ठेवले तरी प्लास्टिक जैसे थे राहते. शिवाय ते जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जर वायू प्रदूषण होते. प्लास्टिक जाळल्याने विविध आजार जडतात. यामुळेच शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली; पण त्यावर योग्य अंमलबजावणी होत नसल्याचेच दिसून येत आहे. सर्वत्र बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. या प्लास्टिक पिशव्यांमुळे कचºयाची विल्हेवाट लावणे संबंधित यंत्रणांना कठीण झाले आहे. वर्धा शहराच्या बाहेरून जाणाºया नागपूर-यवतमाळ बायपासच्या दुतर्फा कचºयाचे ढिगारे आहेत. या कचºयाच्या ढिगाºयामध्ये बहुतांश कचरा प्लास्टिकचाच दिसून येतो. हा प्रकार केवळ वर्धा शहरातच नव्हे तर अन्य ठिकाणीही दिसून येतो. या कचºयाच्या ढिगाºयांवर मोकाट गुरे ताव मारताना दिसतात. अन्नपदार्थ शोधत असताना प्लास्टिक पिशव्याही गुरांच्या पोटात जातात. यात त्यांना जीव गमवावा लागतो. आजपर्यंत अनेक गुरांचा प्लास्टिक पिशव्या खाल्ल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. पावसाळ्यात अनेक नाल्या प्लास्टिक पिशव्यांमुळेच ‘चोक अप’ होतात. परिणामी, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांमुळे नाल्या तुंबून सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसते. शिवाय जलस्त्रोतांमध्ये प्लास्टिक अडकून पाणी टंचाईचाही अनेकदा सामना करावा लागतो. या सर्व बाबी असताना प्लास्टिकच्या सर्रास वापराकडे दुर्लक्ष होत आहे. न.प.कडून धाड टाकून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या जातात; पण काही व्यापारी पुन्हा तोच व्यवसाय करतात. त्यामुळे जिल्ह्यातून प्लास्टिक पिशव्या हद्दपार होताना दिसत नाही. याबाबत जनजागृती करणे गरजेचे झाले आहे.जागृतीसह संकल्प गरजेचापालिका प्रशासनाकडून वारंवार प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची कारवाई केली जाते; पण व्यापारी पुन्हा त्यांचा व्यवसाय करीत असल्याने प्लास्टिकचा खच पाहायला मिळतो. हा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांमध्येच जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. सामाजिक संघटना, संस्थांनी पुढाकार घेत प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती अभियान हाती घेणे, इतकेच नव्हे तर नागरिकांकडून प्लास्टिक वापरणार नाही, असे संकल्प पत्र भरून घेणे गरजेचे झाले आहे. यासाठी नगर पालिकांसह जिल्हा प्रशासनानेही भरीव सहकार्य करणे गरजेचे झाले आहे.कचºयाच्या ढिगात केवळ प्लास्टिकशहरात तथा शहराबाहेरही दिसणाºया बहुतांश कचºयाच्या ढिगाºयांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचाच अधिक खच दिसून येतो. हे प्लास्टिक सर्वत्र उडत असल्याने प्रदूषण वाढत दिसते. शिवाय कचºयाच्या ढिगाºयामध्ये अन्न शोधणारी गुरे हे प्लास्टिक खात असल्याने त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. अनेक गुरांचा प्लास्टिक खाल्ल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
प्लास्टिक घेतेय गुरांचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 1:05 AM
प्लास्टिकचा वापर टाळावा म्हणून देशपातळीवर जनजागृती केली जात आहे. नागरिकांना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरू नये, असे आवाहन केले जात आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : बायपास मार्गावर प्लास्टिक कचºयाचा खच