शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

१२ गावांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Published: July 27, 2016 12:07 AM

तालुक्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने बारा गावांतील १०० हेक्टरवरील शेतजमिनीवर

त्वरित मदतीची गरज : अतिवृष्टीच्या सर्वेक्षणासाठी तहसीलदारांना निवेदनातून साकडे आर्वी : तालुक्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने बारा गावांतील १०० हेक्टरवरील शेतजमिनीवर पेरलेले बियाणे वाहून गेले. यात पंधरवाडा उलटूनही महसूल विभागाने अतिवृष्टीग्रस्त भागाचा सर्व्हे केला नाही. यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सदर शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत तहसीलदार मनोहर चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात ८ व ९ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील लाडेगाव, टाकरखेडा, नांदपूर, देऊरवाडा, निंबोली (शेंडे), कर्माबाद, माटोडा, एकलारा, धनोडी, नांदपूर, अहिरवाडा, राजापूर या गावांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. यात शेतात नुकतीच पेरणी केलेले कपाशी, तूर, सोयाबीन बियाणे या अतिवृष्टीच्या पावसाने वाहून गेले. या सर्व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. १५ दिवसांचा कालावधी लोटूनही नुकसानग्रस्त शेतांचा सर्व्हे करण्यात आला नाही. यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा तालुका सरचिटणीस मनीष उभाड व शेतकऱ्यांनी केली आहे. पहिल्याच पावसात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, कपाशी, तूर, बियाणे, खते आणि पेरणीवर झालेला खर्च पूर्णत: बुडाला. आता पेरणीसाठी दुबार खर्च कसा करावा, या विवंचनेत शेतकरी आहेत. या सर्व बाबींची दखल तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती व महसूल विभागाने घेणे गरजेचे आहे; पण अद्याप सर्वेक्षण न झाल्याने मदत मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बॅकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज देताना पीक विम्यासाठी दोन टक्के रक्कम कापून घेतली. आता शेतकऱ्यांची पेरणीच व्यर्थ ठरल्याने नुकसानीची रक्कम बँका देणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील पूर्णत: शेती बुडालेल्या भागात त्वरित सर्वेक्षण करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी सुरेंद्र संकलेचा, धनराज इंगळे, सचिन घोडमारे, सुनील जगताप व शेतकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी) पिके समाधानकारक; पण पर्जन्यमान अपर्याप्तच रोहणा : परिसरात १५ जूनपासून पाहिजे तेवढा व पाहिजे तेव्हा पाऊस आल्याने परिसरातील कापूस, सोयाबीन, तूर, मुंग, उडीत आदी पिके समाधानकारक आहेत; पण अर्धा पावसाळा संपत असताना नदी, नाल्यांना पूर येऊन ते प्रवाहित झाले नाहीत. शेतातील अनेक विहिरींची पातळी उन्हाळ्यात होती तेवढीच आहे. काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास भविष्यात ओलित कसे होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहणा परिसरातील पिके सध्या समाधानकारक दिसत असली तरी जमिनीतील खोल गेलेली पाण्याची पातळी वर येण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. नदी, नाल्यांना पूर येऊन ते वाहते झाल्याशिवाय जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होणार नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. भोलेश्वरी नदी व नाले अद्याप वाहते झाले नाही. मागील दोन वर्षे झालेल्या कमी पावसाने अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नदी, नाले कोरडे असल्याने त्यावर चालणारे मोटारपंप बंद असल्याचे दिसते. ओलित बंद झाल्याने शेतात विहीर आहे; पण ओलित नाही, अशी अवस्था आहे. राज्यातील इतर भागात बरसणारा पाऊस रोहणा परिसरावर रूष्ट झाल्याचे जाणवत आहे. पावसातील खंडामुळे पिकाच्या आंतर मशागतीची कामे गतिमान झालीत. यांत्रिकीकरणाच्या युगात बैलजोड्यांची संख्या कमी झाली. बैलजोडी असलेले शेतकरी प्रथम स्वत:च्या शेतात डवरणी करण्यात व्यस्त असल्याने किरायाने जोडी सांगणाऱ्या शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. निंदणासाठी मजूरही गावात कमी असल्याने अन्य गावांतून त्यांना आणावे लागते. मजुरीसह वाहनाचा खर्च सोसावा लागत आहे. यात वाहन मालकांचे फावत आहे. पावसाचे प्रमाण असेच राहून मान्सून परत फिरला तर भविष्यात अडचण निर्माण होणार, ही भीती शेतकऱ्यांना त्रस्त करीत असल्याचे दिसते.(वार्ताहर)