शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शासकीय कार्यालयात ‘बंदी’ आदेश धुडकावून नागरिकांचा ‘जमाव’ कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 5:00 AM

‘फिफ्टी परसेंट प्रेझेन्स इन ऑफिस’ ही संकल्पना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त असल्याने याचा अवलंब करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्याबाबतच्या सूचना विविध शासकीय कार्यालयांनाही देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी शासनाच्या सूचनांचे पालन केले जात असले तरी बहुतांश ठिकाणी या सूचनेकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानली जात आहे.  

ठळक मुद्देलोकमतची पाहणी : मार्च एण्डिंगच्या नावाखाली ५० टक्क्यापेक्षा अधिक कर्मचारी उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाच्या अडचणीत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यालयात ५० टक्केच मनुष्यबळाला पाचारण करून कार्यालयीन कामे पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत; परंतु जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयासह इतर विविध शासकीय कार्यालयांत ५० टक्के उपस्थितीच्या नियमाला बगल मिळत असल्याचे, तसेच कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी होत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. नागरिकांची होणारी गर्दी ही कोरोनाच्या प्रसारासाठी पोषक असल्याने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.‘फिफ्टी परसेंट प्रेझेन्स इन ऑफिस’ ही संकल्पना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त असल्याने याचा अवलंब करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्याबाबतच्या सूचना विविध शासकीय कार्यालयांनाही देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी शासनाच्या सूचनांचे पालन केले जात असले तरी बहुतांश ठिकाणी या सूचनेकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानली जात आहे.  कोरोनाबाबत खबरदारीची उपाययोजना असलेल्या शासकीय सूचनेचे जिल्ह्यातील विविध कार्यालयांत पालन होते काय, याचा रिॲलिटी चेक लोकमतने केला असता जिल्ह्याचे मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जि.प. कार्यालयासह काही इतर कार्यालयांत त्याला बगल दिली जात असल्याचे बघावयास मिळाले. विशेष म्हणजे विविध कामानिमित्त शासकीय कार्यालयात येणाऱ्या अनेकांकडून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी उपयुक्त असलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क परिधान करण्याच्या नियमालाच बगल दिली जात असल्याचे वास्तव बघावयास मिळाले.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग कंत्राटदारांची गर्दीवर्धा : जिल्हा परिषद कार्यालयातील बांधकाम विभागाचा मंगळवारी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने रिॲलिटी चेक केला असता या ठिकाणी कंत्राटदारांची मोठी गर्दी दिसून आली. अधिक विचारणा केली असता कामाच्या वाटपासंदर्भात बैठक असल्याने आम्ही या ठिकाणी आलो असल्याचे कार्यालयात गर्दी करणाऱ्यांपैकी काहींनी सांगितले. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या आवारात जि.प.च्या मालकीचे मोठे आणि सुसज्ज सभागृह आहे; परंतु बांधकाम विभागाच्या अभियंत्याने ही बैठक आपल्या छोट्याशा दालनातच घेण्यावर भर ठेवल्याने या ठिकाणी कंत्राटदारांची मोठी गर्दी उसळली होती.

आर्वीच्या बांधकाम विभागात उपस्थिती नियमाला बगलदेऊरवाडा/आर्वी : आर्वी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने बुधवारी सकाळी ११.४५ वाजता जाऊन रिॲलिटी चेक केली असता २० पैकी तब्बल १७ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून आले, तर कार्यालयातील उर्वरित मनुष्यबळाबाबत विचारणा केली असता एक जण वैद्यकीय कारणामुळे तर दोघे इतर कारणामुळे रजेवर असल्याचे सांगण्यात आले. या कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गर्दी बघावयास मिळाली नसली तरी शासनाच्या ‘फिफ्टी परसेंट प्रेझेन्स इन ऑफिस’ या संकल्पनेला छेद देणारा प्रकार बघावयास मिळाला.

सेलूच्या पाटबंधारे विभागात विना मास्क कर्मचारीही हजरसेलू : येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने मंगळवारी जाऊन रिॲलिटी चेक केली असता या कार्यालयात सहापैकी एक कर्मचारी गैरहजर होता. गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्याबाबत विचारणा केली असता तो रजेवर असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी या कार्यालयात कुणी मास्क परिधार करून, तर कुणी विनामास्क असल्याचे चित्र बघावयास मिळाले. इतकेच नव्हे, तर विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गर्दी या कार्यालयात नव्हती. असे असले तरी विनामास्क कार्यालयीन कामकाज करणाऱ्यांना कोरोना संसर्गाबाबत भीती नाही काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या