संघर्ष जाधव ल्ल केळझर विदर्भातील अष्टविनायकापैकी व इतिहास लाभलेल्या केळझरच्या सिध्दीविनायक मंदिरात गणेशोत्सव हर्षोल्लासाने साजरा होत आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात केळझरनगरी भक्तीरसाने न्हाऊन निघत आहे. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह रोज असंख्य भाविक भक्तांची गर्दी होत आहे. या सिध्दीविनायक गणपती मंदिराचा वशिष्ठपूरान व महाभारतामध्ये उल्लेख असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. दंतकथेतील उल्लेखानुसार श्री रामचंद्र प्रभूचे गुरू श्री वशिष्ठ ऋषी यांनी पूजेकरिता या गणपतीची स्थापना केली. त्याच काळात वर्धा नदिचा उगम झाल्याने या गणपतीचे नाव ‘वरद विनायक’ असे पडल्याचे सांगितले जाते. महाभारताप्रमाणे या गावात पांडवही वास्तव्याला असल्याचा उल्लेख आहे. याच गावात बकासूर नावाच्या राक्षसाला मारल्याचाही उल्लेख आहे. वर्धा-नागपूर मुख्य मार्गावर गावाच्या अग्निय दिशेला बौध्द विहाराच्या समोर बकासूर तोंड्या राक्षसाचे मैदान म्हणून प्रचलीत आहे. ज्या टेकडीवर गणपतीचे मंदिर आहे त्या टेकडीला वाकाटकाच्या काळापासून एक भव्य किल्ल्याचे ठिकाण असल्याचे बोलले जात आहे. याच गावात जैन पंथाचे आठवे तिर्थनकार चंद्रप्रभू स्वामींची सुंदर मूर्ती मिळाली असून ती आठव्या शतकातील असावी असा पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसेच महालक्ष्मी व ज्योतिलिंग हे दोन्ही अंदाजे दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीचे असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या निसर्गाच्या कुशीत व असलेल्या या मंदिराला महत्व प्राप्त असलेल्या श्री क्षेत्राला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला असून शासकीय निधीमधून या मंदिराच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याने भाविकांना सर्व सोयी सुविधा पुरविण्याकरिता मंदिराचे विश्वस्त मंडळ कटीबध्द आहे. या ऐतिहासिक वारस्यामुळेच येथे भाविकांची गर्दी वाढत असल्याचे बोलले जात आहे. ४येथील वरदविनायक गणपतीची मूर्ती चार फुट सहा इंच उंच असून तिचा व्यास चौदा फूट आहे. अत्यंत प्रसन्न चित्र मनमोहक सजिव (जागृत) मूर्ती असून विदर्भातील अष्टविनायकामधील एक प्रमुख म्हणून सर्वदूर परिचित आहे. या इतिहासामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. ४१ सप्टेंबर १९९३ रोजी या मंदिरात जिर्णोध्दाराचे कामाला सुरूवात झाली. सन १९९४ मधील महाशिवरात्रीच्या अगोदर खोदकाम सुरू असताना भव्य शिवलिंग मिळाले. त्याला उल्लेख शिवलीला अमृताच्या शेवटच्या अध्यायात एकचक्रनगरला ज्योतिर्लिंग असल्याची नोंद आहे. यामुळे येथेही गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
केळझरच्या सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
By admin | Published: September 13, 2016 1:17 AM