लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर बेताल वाहतुकीचे दर्शन घडते. वर्दळीच्या रस्त्यावर दुचाकी भरधाव दामटविणाऱ्या तरूणांना लगाम लावण्याची गरज नागरिकातून व्यक्त होत आहे. शहरातील रस्त्यावर अपघाताच्या संख्येत वाढ झाली असून पादचाºयांनाही रस्त्याने जाताना सुरक्षेची हमी राहिली नाही.रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. या वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडत आहे. वाहतुकीची कोंडी ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शहरात रस्ता बांधकाम सुरू असल्याने वाहतूक प्रभावीत होते. यात काही रस्त्यावर बेताल वाहतूक असल्याने येथून आवागमन करणे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. अल्पवयीन चालकांची वाढती संख्या पाहता पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे दिसते. अरूंद रस्ते, पार्किंगचा अभाव, वाहनांची वाढती संख्या, वाहनांची वाढलेली गती आणि वाहतूक पोलिसांची कमतरता आदी कारणाने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.भरधाव वाहनांमुळे पादचाºयांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणे कठीण होते. पोलिसांकडून कारवाई होत असली तरी येथील वाहतुकीची स्थिती जैसे थे होते. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. रस्त्याने वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, दुचाकी वाहनावर ट्रिपल सीट जाणे अशा वाहतुकीच्या नियमांचे येथे उल्लंघन होत असताना पोलीस दुर्लक्ष करताना दिसतात. येथील प्रमुख चौकात अतिक्रमण आहे. ही बाब वाहतुकीची कोंडी करणारी ठरत आहे. तसेच फेरीवाल्यामुळेही वाहन चालविण्यासाठी जागा नसते. अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही झाली तरी त्यावर पुन्हा अतिक्रमण झालेले दिसते. वर्दळीच्या रस्त्यातून दुचाकी भरधाव घेऊन जाणे ही तर फॅशनच झाली आहे. यातून मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराला वेळीच आवर घालणे गरजेचे झाले आहे. वर्दळीच्या रस्त्यावरून जडवाहनासह प्रवासी वाहतूक होत असते. अरूंद रस्त्यावरून दुचाकी भरधाव घेऊन जाणाºया चालकांमुळे अपघात झाले आहे. या मार्गावरील दुकानदार जडवाहन रस्त्यावर उभी करून मालाची लोडिंग करतात. यामुळे वाहतूक खोळंबते. पोलीस प्रशासनाने यावर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी आहे.वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षबस स्टँड ते शिवाजी चौक, गांधी चौक ते पद्मावती चौक या मुख्य चौकात सध्या वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. बसस्थानक ते शिवाजी चौकापर्यंत वाहनतळाची व्यवस्था नसल्याने वाहने व्यापारी प्रतिष्ठानासमोरच ठेवतात. यामुळे आवागमन करायला निमुळता रस्ता असतो. अनेकदा या मार्गावर वाहतूक विस्कळीत होते. शिवाजी ते पद्मावतीकडे चौकापर्यंतची वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आहे.
बेशिस्त वाहनचालकांना लगाम लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:11 AM
शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर बेताल वाहतुकीचे दर्शन घडते. वर्दळीच्या रस्त्यावर दुचाकी भरधाव दामटविणाऱ्या तरूणांना लगाम लावण्याची गरज......
ठळक मुद्देनागरिकांची मागणी: बसस्टँड ते शिवाजी चौक रस्ता झाला धोकादायक