आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : तालुक्यातील पेठ अहमदपूर येथील शिक्षक कॉलनीतील हुसैन खान सैफुल्ला खान पठाण यांच्या घरी सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात पाण्याची टाकी, घरगुती वापराचे साहित्य, दरवाजे, खिडक्या तथा दुकानातील साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.हा स्फोट इतका भीषण होता की, घरावर असलेली पाण्याची मजबूत टाकी व सिलिंडर चकनाचुर झाले. स्फोट झाल्याबरोबर आगीने घराला वेढले. वºहाड्यांत मोठा खड्डा पडला. घरातील भांडी फुटलीत. स्फोट झाल्याबरोबर सभोवताल राहणाºया लोकांनी हुसैन यांच्या घराकडे धाव घेतली. सर्वांनी पाणी टाकून लागलेली आग आटोक्यात आणली व अतिरिक्त भरलेले सिलिंडर घराबाहेर काढले. वºहांड्यातून घरातील मंडळींची ये-जा नसल्यामुळे सिलिंडरच्या स्फोटानंतर मोठा अनर्थ टळला.हुसैन यांची मुलगी नुझहत जबीन हिचा डावा हात भाजला व चेहºयावर आस लागली. या स्फोटात अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज हुसैन यांनी वर्तविला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एएसआय भगवान बावणे यांनी पंचनामा केला. त्यांच्यासोबत गृहरक्षक धिरज काळे होते. तहसीलदारांनी या घटनेचा पंचनामा करून आपणास आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी हुसैन यांनी केली आहे.सिलिंडर स्फोटासंबंधी गॅस कंपनीकडे चौकशी करून ज्या दोषांमुळे सिलिंडरचा स्फोट होतो, ते कारण शोधून काढण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे. कालबाह्य सिलिंडर असल्यामुळे स्फोट होऊ शकतो. त्यामुळे कालबाह्य सिलिंडरचा पुरवठा थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पेठ अहमदपूरच्या शिक्षक कॉलनीत सिलिंडरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 11:38 PM
तालुक्यातील पेठ अहमदपूर येथील शिक्षक कॉलनीतील हुसैन खान सैफुल्ला खान पठाण यांच्या घरी सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात पाण्याची टाकी, घरगुती वापराचे साहित्य, दरवाजे, खिडक्या तथा दुकानातील साहित्य जळून खाक झाले.
ठळक मुद्देसाहित्याचा कोळसा : २.५० लाखांचे नुकसान