लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकºयांचे लक्ष उत्पन्न हाती येण्याकडे लागले आहे. अशातच जंगली श्वापदांनी शेतात उच्छाद मांडला आहे. रोही व रानडुक्करांनी रात्रीतून कपाशी पिकाची नासधुस केल्याने शेतकºयांवर आर्थिक कुºहाड कोसळली आहे.कोलगाव मौजात घोराड येथील मनोज शेषराव पोहाणे या युवा शेतकºयांची एक हेक्टरमध्ये कपाशी आहे. कपाशी पासून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा असतानाच कपाशीच्या वेचणीला उद्यापासून सुरुवात करायची तर शुक्रवारच्या रात्री रोह्यांनी जवळपास १ एकरातील कपाशीची मोडतोड करून जमीनदोस्त केली. शनिवारी सकाळी शेतात गेल्यानंतर रोह्यांनी केलेला प्रकार पाहता हिरमोड होण्याची वेळ आली.हाच प्रकार हिंगणी, बिबी, आदी मौजात घउत आहे. शेतीमध्ये रानडुक्करांच्या हैदोसाने अनेकांची पिके फस्त झाली आहेत. पण वनविभागाकडे तक्रार करूनही पाहिजे त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी तक्रार करण्यास धजावत आहे. मनोज पोहाणे यांनी वनविभागाकडे तक्रार करण्याकरिता केळझर येथे गेले असता त्यांना सेलू येथील कार्यालयात पाठविण्यात आले. या त्रासापोटी शेतकºयांकडून तक्रारी करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.यंदाच्या खरीपात पावसाच्या अनागोंदीमुळे उत्पानात घट झाली. यात शेतात असलेले उत्पादन काढून घरी नेण्याच्या तयारी असताना जंगलव्याप्त भागात जंगली श्वापदांकडून मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान करीत आहेत. यामुळे अशा भागातील शेतकºयांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई वनविभागाकडून देण्याचे आदेश असताना तक्रार करण्याकरिता गेलेल्या शेतकºयांना वनविभागाच्या कर्मचाºयांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचे समोर आले आहे.
रोह्यांनी केले उभ्या कपाशीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:17 PM
अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकºयांचे लक्ष उत्पन्न हाती येण्याकडे लागले आहे. अशातच जंगली श्वापदांनी शेतात उच्छाद मांडला आहे.
ठळक मुद्देवेचणीला आलेल्या कपाशीची झाडे केली जमीनदोस्त