लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डेंग्यू आजाराला आळा घालणे ही सामुहिक जबाबदारी आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळून तसेच परिसर स्वच्छ ठेवून नागरीकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन देवळी पं.स.च्या सभापती विद्या भुजाडे यांनी केले.देवळी तालुक्यातील वाबगाव येथील ग्रा. पं. कार्यालयातील सभागृहात किटकजन्य व जलजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर पं.स. सदस्य शंकर उईके, डॉ. स्वेता थुल, तालुका आरोग्य सहाय्यक शेख हुसेन, बबीता ताकसांडे, पोलीस पाटील विजय खुटाळे, आरोग्य सहाय्यक शरद डांगरे, आरोग्य सेविका सविता झाडे, विनोद पाटील, दिलीप उटाणे आदी उपस्थित होते.सभापती विद्या भुजाडे पुढे म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वांनी सावधगिरीची भुमिका घेत योग्य उपाययोजना केल्या पाहिजे. शिवाय नागरिकांना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. आरोग्य विभागांच्या सूचनांचे पालन केल्यास गावातूनच नव्हे तर जिल्ह्यातून डेंग्यूला हद्दपार करता येईल. डासांची निर्मिती होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकांने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळत भांडी धुवून पुसून कोरडी करावी. यामुळे डेंग्यूचा प्रसार करणाºया एडिस डासाची निर्मिती होणार नाही. शिवाय झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. शिवाय ग्रा.पं.ने स्वच्छते विषयी योग्य उपाययोजना कराव्या, असे सांगितले. याप्रसंगी आरोग्य सेवक दिलीप उटाणे, पं.स. सदस्य शंकर उईके, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वेता थुल, शेख हुसेन बबीता ताकसांडे, पोलीस पाटील विजय खुटाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमापूर्वी पं.स.तील लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांशी संवाद साधला. कार्यक्रमाला निलेश साटोणे, शैलेश चौधरी, शिला मडाव, अस्मिता डाहाके, आशा डेबरे, संघपाल गायकवाड, प्रभाकर परातपुरे आदींची उपस्थिती होती.
डेंग्यू आजाराला आळा घालणे ही सामूहिक जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:51 PM
डेंग्यू आजाराला आळा घालणे ही सामुहिक जबाबदारी आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळून तसेच परिसर स्वच्छ ठेवून नागरीकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन देवळी पं.स.च्या सभापती विद्या भुजाडे यांनी केले.
ठळक मुद्देविद्या भुजाडे : किटकजन्य व जलजन्य आजार नियंत्रण विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम