लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा(घा.) : कारंजा शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. परंतु, या महामार्गावर सध्या मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. त्याकडे स्थानिक नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.स्थानिक गोळीबार चौक, बसस्थानक परिसरात आदी ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे नेहमीच बसून असतात. रस्त्यावरील मोकाट जनावरे रात्रीच्या सुमारास वाहनचालकांच्या सहज निदर्शनास येत नाहीत. त्यामुळे मोठ्या अपघाताची भीती असते. महामार्ग क्र. ६ चे दहा वर्षांपूर्वी रुंदीकरण व सौंदर्यीकरण करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दुभाजकही तेथे बनविण्यात आले. परंतु, याच दुभाजकावर सध्या मोकाट जनावरे बसून असता. इतकेच नव्हे तर बहूदा ही मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमधच बसतात. बस स्थानक व गोळीबार चौक परिसरात मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध बसून राहत असल्याने तेथील वाहतूक अनेकदा खोळंबते. महामार्गावरील रस्ता दुभाजकामध्ये रस्त्याचे रुंदीकरण करताना विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली होती. परंतु, सध्या मोकाट जनावरे तेथे बसत असल्याने ती पूर्णत: नष्ट झाली आहेत. खोळंबणारी वाहतूक लक्षात घेता पोलीस प्रशासनाने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे. या मार्गावर मोकाट जनावरांमुळे अनेक अपघात झाले. त्यात काहींना आपले प्राण गमवावे लागले असून काहींना कायमचे अपंगत्त्व आले असल्याचे वास्तव आहे. संभाव्य धोका लक्षात घेवून स्थानिक नगरपंचायत प्रशासन, महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापान व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून सदर मोकाट जनावरे ताब्यात घेत जनावर मालकांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आहे.महामार्गावर ओव्हरब्रीज बांधण्याची मागणीवाढलेले रहदारी लक्षात घेता सदर महामार्गावर गोळीबार चौकात ओव्हर ब्रीज तयार करण्याची मागणी आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात आहे.येथे नगरपंचायत होण्यापूर्वी सदर मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ती मागणी पूर्णत्त्वास जाऊ शकली नसल्याचे शहरातील सुजान नागरिक सांगतात. संभाव्य धोका व वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेता तात्काळ लोकप्रतिनिधींनी येथील गोळीबार चौकात ओव्हर ब्रीज तयार करण्याची मागणी संबंधितांकडे रेटावी अशी मागणीही कारंजा येथील रहिवाशांची आहे.आठ वर्षांत शंभरावर अपघातया महामार्गावर गत आठ वर्षांच्या कालावधीत १०० हून अधिक अपघात झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यात सुमारे ३५ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर ९० हून अधिक नागरिकांना कायमचे अपंगत्त्व आल्याचे सांगण्यात येते.महामार्गावर उड्डाण पुलाची निर्मिती व्हावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह आजी-माजी आमदार व खासदारांनी पुढाकार घेत संबंधितांना धारेवर धरण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही आहे.
रस्त्यावरील मोकाट जनावर धोक्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:46 PM
कारंजा शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. परंतु, या महामार्गावर सध्या मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. त्याकडे स्थानिक नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे.
ठळक मुद्देनगरपंचायतीचे दुर्लक्ष : अनुचित घटनेला मिळतेय आमंत्रण