चिकणी (जामणी) : अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात मदत व्हावी, यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत नॅनो युरिया व डीएपी खतासाठी अनुदान दिले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे लागणार होते. परंतु फार कमी शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
नॅनो युरिया, डीएपी अनुदानावरसन २०२४-२५ या चालू खरीप हंगामात अनुदानाच्या योजना अंतर्गत नॅनो युरिया व डीएपी सोयाबीन, कापूस आदी पिकांकरिता अनुदानावर मिळणार आहे.
येथे करण्यात आले ऑनलाईन अर्जनिविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थीची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाइन अर्जातून करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे, औषधे व खते या बाबींतर्गत अर्ज करायचा होता. शेतकऱ्यांना https://mahadbt.maharashtra.gov.i/farmer/login/ login या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करायचा होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे.