शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

कृतीतून दत्तकग्राम आमलाची ‘नाम’वंत वाटचाल

By admin | Published: July 07, 2016 2:15 AM

नाम फाऊंडेशनने सर्वांगीण विकासासाठी दत्तक घेतलेल्या आमला गावात गत आठ महिन्यांत विविध कामे करण्यात आली.

गाव विकासाच्या कामांची पायाभरणी : नाम फाऊंडेशनच्या कार्याला लोकसहभागाची जोडवर्धा : नाम फाऊंडेशनने सर्वांगीण विकासासाठी दत्तक घेतलेल्या आमला गावात गत आठ महिन्यांत विविध कामे करण्यात आली. यात ८ ते १० किमी अंतराच्या नाल्यांचे खोलीकरण, रूंदीकरण, तीन बंधाऱ्यांचा गाळ उपसा, १६०० मीटर नवीन नाल्याची निर्मिती, जोडगाव असलेल्या तिगाव येथे १४०० मीटर नवीन नाल्याची निर्मिती, बसस्थानकाचे सौंदर्यीकरण, प्रवाशांकरिता सिमेंट बाकडे आदींचा समावेश आहे. या कामांमुळे दत्तकग्राम आमलाची ‘नाम’वंत वाटचाल सुरू असल्याचेच दिसते.आमला गावातील कृष्णाजी महाराज मंदिर हे पंचक्रोशीत प्रसिद्ध व नावारूपास आलेले धार्मिक स्थळ असून दरवर्षी येथे यात्रा उत्सव होतो. यानिमित्त हजारो भाविक या उत्सवात सहभागी होतात. मंदिराकडे जाण्याची अडचण पाहता ग्रामस्थांनी सामूहिक निर्णय घेतला. परिसरातील १० ते ११ शेतकऱ्यांनी मंदिराकडे जाणारा रस्ता तयार व्हावा म्हणून आपल्या शेतातील जागा उपलब्ध करून दिली. नाम फाऊंडेशनने या अंदाजे दीड किमी पांदण रस्त्याची निर्मिती केली. आमला गावाकडून पहाडाकडे जाणाऱ्या नवीन पांदण रस्त्यावर शेतात प्रवेश करण्यासाठी शेतकऱ्यांना सिमेंट पायलीचे पूल टाकून देण्यात आले. गावाजवळून वाहणारा नाला बूजवून दीड-दोन एकर जागेचे सपाटीकरण करून गावगोठा, शेणखत खड्डे व मुलांना खेळण्याकरिता क्रीडांगण तयार करण्यात आले.जि.प. प्राथमिक शाळा व अंगणवाडीला सिमेंट पोल व लोखंडी जाळीचे कुंपण बसवून देण्यात आले. ग्रा.पं. समोरील जागेवर शहाबादी फरशी बसवून २० बाय ६० अर्थात १२०० स्केअर फुट जागेचे सौंदर्यीकरण करण्यात आले. ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सिमेंटच्या आठ कचऱ्याकुंड्या ठेवण्यात आल्या. यात सुका कचरा साचवला जातो. ओला कचरा शेणखत्याच्या खड्ड्यात पुरण्याची सवय ग्रामस्थांना लावण्यात आली.१५२ कुटुंबांच्या आमला गावातील प्रत्येक नागरिकाला वैद्यकीय दिलासा कार्डची सुविधा वैद्यकीय जनजागृती मंच यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आली. या कार्डद्वारे रुग्णांना मोफत तपासणी व उपचार सेवा लागू झाली. याचा गावातील सर्वांना लाभ होत आहे. महिलांच्या रोजगाराचा विचार करता लेदर बॅग निर्मिती प्रशिक्षण देण्यात येत आहे. यातून रोजगार निर्मिती करून देण्याचे प्रयत्न सुरू आहे. गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या लहान-मोठ्या नाल्यांची (७००मीटर) दुरूस्ती करून स्वच्छतेला हातभार लावण्यात आला. विविध प्रजातीची ५०० रोपे लावण्याचा संकल्प केला आहे. गावात वृक्षलागवड सुरू आहे.या मोहिमेत व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे व त्यांचे सहकारी, ‘नाम’चे आर्कि. रवींद्र पाटील, मनीष मिसाळ, सुरेश कांबळे, बा.दे. हांडे, मुरलीधर बेलखोडे, अरुण निमकर्डे, सरपंच मोहन इंगळे, उपसरपंच मंगला महल्ले, विठ्ठल इंगळे, सर्व ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रीतम महल्ले, गौरव इंगळे, अखिल भुजाडे, मयूर डोळसकर यांच्यासह ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग आहे.(कार्यालय प्रतिनिधी)