लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरातील विविध भागात रविवारी लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडत असतानाच रात्री ११.३० वाजताच्या सुमारास बुरड मोहल्ला परिसरात जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी एकाची धारदार चाकूने वार करून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित रामसिंग बैस (२८) रा. कंजर मोहल्ला, इतवारा वर्धा, असे मृतकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, मृत रोहीत बैस तसेच शिवा उर्फ लंगड्या राजू मडावी रा. इतवारा यांच्यात जुना वाद होता. त्यांच्यात वेळोवेळी खटके उडत होते. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास शिवा उर्फ लंगड्या मडावी व मृतक रोहीत यांच्यात सुरूवातीला शाब्दिक चकमक झाली. बघता बघता हा वाद विकोपाला जाऊन शिवा व त्याचा सहकारी शुभम उर्फ ददन राजू मडावी याने जवळ असलेल्या चाकूने रोहीत याला निर्दयतेचा कळस गाठत मारहाण केली.यात गंभीर जखमी झालेल्या रोहीत याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी संकेत संपत बैस रा. इतवारा बाजार याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात शिवा उर्फ लंगड्या राजू मडावी आणि शुभम उर्फ ददन राजू मडावी यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.मृतावर अनेक गंभीर गुन्हेमृत रोहीत बैस याच्याविरुद्ध मारहाण करणे, परिसरात दहशत निर्माण करणे आदी प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे एका प्रकरणात त्याला न्यायालयाने शिक्षाही ठोठावली आहे. ज्या प्रकरणात त्याला न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आली त्याच प्रकरणात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. शिवाय सध्या तो जामिनावर बाहेर होता, असे पोलीस सुत्रांनी सांगितले.रोहीतच्या शरीरावर एकूण २० वारआरोपी शिवा उर्फ लंगड्या राजू मडावी आणि शुभम उर्फ ददन राजू मडावी यांनी निर्दयतेचा कळस गाठतच रोहीत बैस याला चाकूने मारहाण केली. सोमवारी रोहीत बैस याच्या मृतदेहाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आरोपींनी रोहीतच्या शरिरावर चाकूने तब्बल २० वार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पुढील तपास ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखेडे करीत आहेत.पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यातसदर प्रकाराची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनच्या चमुने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची मदत घेण्यात आली. शहर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशेष शोधमोहिम राबवून आरोपी शुभम उर्फ ददन राजू मडावी याला वर्धेच्या इतवारा बाजार परिसरातून तर शिवा उर्फ लंगल्या राजू मडावी याला नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथून ताब्यात घेतले आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बुरड मोहल्ल्यात खुनीथरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 5:00 AM
मृत रोहीत बैस तसेच शिवा उर्फ लंगड्या राजू मडावी रा. इतवारा यांच्यात जुना वाद होता. त्यांच्यात वेळोवेळी खटके उडत होते. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास शिवा उर्फ लंगड्या मडावी व मृतक रोहीत यांच्यात सुरूवातीला शाब्दिक चकमक झाली. बघता बघता हा वाद विकोपाला जाऊन शिवा व त्याचा सहकारी शुभम उर्फ ददन राजू मडावी याने जवळ असलेल्या चाकूने रोहीत याला निर्दयतेचा कळस गाठत मारहाण केली.
ठळक मुद्देचाकूने वार करून एकाची हत्या : जुन्या वाद गेला विकोपाला