शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

राधिका स्पेशल आईस्क्रीममध्ये आढळले मृत कीटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 6:00 AM

राधिका रेस्टॉरेंट प्रमुख मार्गालगत असून पार्किंग सुविधा नसल्याने येथे येणाऱ्या ग्राहकांना चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक पोलिस आदिती मेडिकल परिसरात असतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून कधीही या हॉटेलवर कारवाई झाली नाही. कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.

ठळक मुद्देराधिका रेस्टॉरेंटमधील प्रकार । ‘एफडीए’ने विश्लेषणाकरिता पाठविले नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राधिका रेस्टॉरेंटमधील ‘राधिका स्पेशल आईस्क्रिम’मध्ये चक्क मृत कीटक आढळून आले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजतादरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी हॉटेलवर कारवाई केली.शहरातील प्रमुख मार्गालगत राधिका रेस्टॉरेंट असून ते सुनीता सुनील मुरारका यांच्या मालकीचे आहे. शुक्रवारी राधिका रेस्टॉरेंटमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषद आटोपल्यानंतर आयोजकांनी भोजन ठेवले होते. भोजनानंतर पत्रकार बांधवांना राधिका स्पेशल आईस्क्रिम देण्यात आले. एका मराठी वृत्तपत्राचे पत्रकार हे आईस्क्रिम खात असताना त्यामध्ये मृत कीटक आढळून आले. या प्रकारामुळे या पत्रकारालाही धक्का बसला आणि राधिका रेस्टॉरेंटमध्ये एकच हल्लकल्लोळ झाला. पत्रकारांनी अन्न व औषध प्रशासनाला घडलेल्या प्रकाराविषयी माहिती दिल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे लगेच ‘राधिका’त पोहोचले. यानंतर त्यांनी नमुना सहाय्यक व इतर अधिकाऱ्यांना पाचारण केले. अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान राधिका स्पेशल आईस्क्रिमचे नमुने विश्लेषणाकरिता घेतले. हॉटेलमालक मुरारका यांच्याकडे घडलेल्या प्रकाराविषयी विचारणा केली असता त्यांनी टोलवाटोलवी करीत प्रकरण दडपण्याचा करण्याचा प्रयत्न केला. अधिकाºयांनी आढळून आलेल्या त्रुटींच्या आधारे किचनची तपासणी करीत हॉटेलमालकाला धारेवर धरले. हॉटेलच्या किचनमध्ये जाळे लोंबकळत होते. सर्वत्र अस्वच्छता होती. खाद्यपदार्थ तयार करणाºया कर्मचाºयांचाही पोषाखही अस्वच्छ होता. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापन थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचीच बाब पुढे आली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रात्री ८ वाजतापर्यंत तब्बल दोन तास कारवाई केली. या कारवाईची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने इतर हॉटेल व्यावसायिकांचेही धाबे दणाणले होते. यापूर्वीही राधिका हॉटेलमधील छोला भटुरामधील काबुली चण्यात कीटक आढळून आले होते. मात्र, याची वाच्यता न झाल्याने हे प्रकरण दडपले गेले. शुक्रवारी घडलेल्या प्रकारामुळे राधिका हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे, नमुना सहायक संजय धकाते, अमित तृपकाने यांनी केली. या हॉटेलवर अहवालाअंती अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ ग्राहकांना देऊन मागील अनेक दिवसांपासून राधिका रेस्टॉरेंट ग्राहकांच्या आरोग्याविषयी खेळत असल्याचा आरोपही आता नागरिकांतून होत आहे.हॉटेलकडे पार्किंगची सुविधाच नाही, पालिका-पोलिसांची कृपादृष्टीराधिका रेस्टॉरेंट प्रमुख मार्गालगत असून पार्किंग सुविधा नसल्याने येथे येणाऱ्या ग्राहकांना चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक पोलिस आदिती मेडिकल परिसरात असतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून कधीही या हॉटेलवर कारवाई झाली नाही. कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.हॉटेलमधील आईस्क्रिमचे नमुने घेतले असून ते नागपूर येथे विश्लेषणाकरिता पाठविले आहेत. किचनमध्ये अस्वच्छता आढळल्याने हॉटेलमालकाला सुधारणा नोटीस बजावण्यात येणार आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर ‘राधिका’वर निलंबन अथवा दंडात्मक कारवाई केली जाईल.रविराज धाबर्डे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, वर्धा

टॅग्स :hotelहॉटेल