लोकमत न्यूज नेटवर्कआंजी (मोठी) : वर्धा- आर्वी या मार्गाचे चौपदरीकरण सध्या केले जात आहे. याच कामादरम्यान रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आलेला मुरूम व्यवस्थित केल्या जात असताना मशीनखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. विलास महादेव दोंडीलकर (५०) रा. रामनगर वर्धा व विठ्ठल रामकृष्ण भुजाडे (४२) रा. खरांगणा, असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.वर्धा-आर्वी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा कंत्राट ट्रिनेवा इन्फ्रा प्रा. लि. कंस्ट्रक्शनला देण्यात आला आहे. याच कंपनीच्या माध्यमातून रस्त्याच्या मधोमध टाकलेल्या मुरूम व्यवस्थित केला जात असताना पी.वाय. ३२-१६८ जे. ०३४२ मशीन खाली. विकास आणि विठ्ठल हे आले. परिणामी, ते गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर, आंजी (मो.) पोलीस चौकीचे प्रभारी संतोष कामडी यांची आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले. शिवाय पंचनामा करून घटनेची नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.
मशीनखाली आल्याने दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 10:04 PM
वर्धा- आर्वी या मार्गाचे चौपदरीकरण सध्या केले जात आहे. याच कामादरम्यान रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आलेला मुरूम व्यवस्थित केल्या जात असताना मशीनखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे.
ठळक मुद्देवर्धा-आर्वी मार्गावरील घटना । सुरक्षेच्या दृष्टीने फलकही नाही