शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अंकिताला जाळणारा नराधम विकेश दोषी; फाशी की जन्मठेप?, आज फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 6:33 AM

या घटनेलाही गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली, आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी स्पष्ट केले.

हिंगणघाट (वर्धा) : प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल टाकून जाळून मारणारा नराधम विकेश उर्फ विक्की नगराळे याचा गुन्हा सिद्ध झाला. त्याला फाशी की जन्मठेप याचा निकाल सत्र न्यायालय गुरुवारी जाहीर करेल. थरकाप उडविणाऱ्या या जळीतप्रकरणात मृत्यूशी झुंज देणाऱ्या अंकिताचा १० फेब्रुवारी २०२० रोजी नागपूर येथील रुग्णालयात अंत झाला होता.

या घटनेलाही गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली, आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केंद्रस्थानी ठेवून आरोपीच्या शिक्षेबाबत दोन्ही बाजूंची मते जाणून घेतल्यावर गुरुवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विशेष शासकीय अभियोक्ता ॲड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयीन कामकाज संपल्यावर सांगितले. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. फाशी झाल्यावरच पूर्ण समाधान -- न्यायालयाने आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले आहे. गुन्हा सिद्ध होणे हे आमच्या कुटुंबीयांसाठी तात्पुरते समाधान आहे. ज्यावेळी त्याला फाशीची शिक्षा होईल, तेव्हाच आमचे पूर्ण समाधान होईल. - आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली तरच समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसून वचक निर्माण होईल, असे पीडितेचे वडील म्हणाले.

दाेन वर्षांची प्रतीक्षा - - या बहुचर्चित जळीत प्रकरणाला ३ फेब्रुवारी रोजी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी आरोपी विकी नगराळे याला पोलीस बंदोबस्तात हिंगणघाट येथील न्यायालयात आणण्यात आले होते. - न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले असले तरी त्याला फाशी दिली जाते की जन्मठेप, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता कायम आहे.

आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. सरकारतर्फे आपण न्यायालयाकडे विनंती केली की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हत्येच्या आरोपात आरोपीला दोषी ठरविण्यात येते. त्यावेळी शिक्षेबाबत एक दिवसाची मुदत देण्यात येते. आरोपीला काय शिक्षा द्यावी, याचा एक तक्ता आपण न्यायालयात सादर करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून न्यायालय शिक्षा जाहीर करेल.     - ॲड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

आरोपीला या प्रकरणात दोषी ठरविणे ही आमच्यासाठी अन्यायकारक आणि दुःखद बाब आहे. या प्रकरणात २९ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. शिवाय आपण न्यायालयात ५६ पानांचे रीटन नोट्स ऑफ ऑर्ग्युमेंट दिले. असे असले तरी विकेशला दोषी ठरविण्यात आले आहे. गुरुवारी शिक्षा किती ते (क्वॉन्टम) ठरविले जाईल. आपण या न्यायालयात युक्तिवाद करणार नसून उच्च न्यायालयात दाद मागू.    - ॲड. भूपेंद्र सोने, आरोपीचे वकील

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरCourtन्यायालयPoliceपोलिस