लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : धाम नदी पात्रातील महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाजवळ असलेल्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाला. निखील रविंद्र ढोढरे (१९) असे मृतकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.निखील सोबत संदीप विजय चलाख, आशिक, सागील (आडनाव कळू शकले नाही) हे चार मित्र व सोबत दोन लहानगे सायंकाळी आश्रम परिसरात फिरायला आले होते. यावेळी धाम नदीत असलेल्या महात्मा गांधी यांच्या समाधी जवळ असलेल्या पाण्यात उतरण्याचा मोह त्यांना आवरला नाही. यावेळी निखील, आशिक व सागील हे तिघे पाण्यात उतरले; परंतु खोल पाण्याचा अंदाज न आल्याने निखील गटांगण्या खाऊ लागला, आशिकला पोहणे येत असल्यामुळे त्याने निखिलला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु वाचवू शकला नाही. तीन दिवस गणपती विसर्जनात पोलिसांच्या चोख बंदोबस्तमुळे एकही अनुचित घटना घडली नाही. परंतु विसर्जनाचे दिवस आटोपताच ही घटना घडली.निखिल हा मुळचा नांदगाव(घोसरी), जि. चंद्रपूर येथील असून सद्यस्थितीत शादीजा ट्रेडर्स, वर्धा येथे काम करीत होता. निखिलचा मृतदेह अद्याप सापडला नसून सेवाग्राम पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरूच होते.
नदीत बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:02 AM
लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : धाम नदी पात्रातील महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाजवळ असलेल्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाला. निखील रविंद्र ढोढरे (१९) असे मृतकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.निखील सोबत संदीप विजय चलाख, आशिक, सागील (आडनाव कळू शकले नाही) हे चार मित्र व सोबत दोन लहानगे सायंकाळी आश्रम ...
ठळक मुद्देपवनार येथील घटना : मृतदेहाचा शोध सुरू