लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. परंतु यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हिंगणघाट येथे मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना खासदारांनी त्यांच्याशी या प्रश्नावर दीर्घ चर्चा केली. व संपूर्ण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.मुख्यमंत्र्याशी चर्चा करताना खासदार रामदास तडस म्हणाले की, कमी झालेले पर्जन्यमान यामुळे वर्धा जिल्हयामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यापैकी वर्धा हा एक जिल्हा असून पाणी टंचाईमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते परिणामी सामान्य नागरिक व शेतकरी संकटात सापडलेला आहे. वर्धा जिल्हयातील शेतकºयांची बिकट परिस्थिती पाहता ट्रिगर २ लागू केलेल्या राज्यातील तालुक्यांच्या यादीमध्ये वर्धा जिल्हयातील वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट व आर्वी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करावा, सोबतच संपुर्ण वर्धा जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत सेवाग्राम विकास आराखडा प्रकल्पाची कामे वर्धा जिल्हयात प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामध्ये सेवाग्राम ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांकरिता मुबलक निधी उपलब्ध देण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनीधी व जनतेनी आपणाकडे विनंती केली आहे. सेवाग्राम महात्मा गांधीजींची कर्मभूमी असून जागतीक दर्जाचे पर्यटन केंद्र्र आहे. सेवाग्राम विकास आराखडाच्या माध्यमातून सेवाग्राम सभोवताल अनेक विकास कामे प्रगती पथावर असून या विकासकामांमध्ये सेवाग्राम ग्रामपंचायत गावांतर्गत विकासकामांचा समावेश आराखडयात केल्यास सेवाग्राम ग्रामपंचायतीला एक आदर्श गांव म्हणून विकसीत करण्यास हातभार लागेल. यापूर्वी पवनार व वरुड या ग्रामपंचायती करिता सेवाग्राम विकास आराखडयातून गावांतर्गत विकास कामांकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याच धर्तीवर सेवाग्राम विकास आराखडयातून सेवाग्राम ग्रामपंचायत मधील गावांतर्गत विकास कामे पुर्ण करण्याकरिता रुपये १० कोटीची कामे सुचविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सेवाग्राम विकास आराखडा प्रकल्पाचे आकीर्टेक्ट, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत सेवाग्राम यांना लेखी स्वरुपात कळविले आहे. या सर्व प्रस्तावास शिखर समितीचे अध्यक्ष म्हणून शासन स्तरावरुन त्वरीत प्रशासकीय मान्यता द्यावी व जिल्हाधिकारी यांना आदेशीत करावे अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. केंद्र सरकारच्या चमुकडून दुष्काळी भागाची पाहणी लवकर होणार आहे, याविषयी राज्यसरकार आपल्या मागणीवर नक्कीच सकारात्मक विचार करेल व सोबतच सेवाग्राम विकास आराखडयातून सेवाग्राम ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामाकरिता निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.सेवाग्राम ग्रा.पं.ला १० कोटी द्याविकास आराखड्यात वरूड, पवनार यासह अनेक ग्रामपंचायतला निधी दिला आहे. मात्र सेवाग्राम गावात अंतर्गत विकास कामांसाठी १० कोटी रूपये देण्यात यावे अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली.
संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:33 PM
शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. परंतु यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा,.....
ठळक मुद्देसेवाग्रामला निधी द्या : खासदारांची मुख्यमंत्र्यासोबत चर्चा