शिक्षक संघटनांचे निवेदन : मुक्काम करणे ठरते गैरसोयीचेवर्धा : आगामी जि.प. व पं.स.च्या सार्वत्रिक निवणुकीत मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येवू नये. मतदान केंद्रावर असलेल्या सुविधांअभावी त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. मुक्कामाचे ठिकाण अनेकदा अत्यंत गैरसोयीचे असते. ही बाब महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाधक ठरणारी आहे. मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांऐवजी पुरूष कर्मचारी नियुक्त करावे, अशी मागणी प्र्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या निवेदनातून केली आहे.या मागणीचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी व उपजिल्हाधिकारी लोणकर यांनी स्वीकारले. महिलांऐवजी खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विभागातील पुरूष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास महिलांना मतदान केंद्रावर नियुक्त करण्याची आवश्यकता भासणार नाही. यानंतरही आवश्यकता असल्यास महिलांना मुख्यालयाच्या केंद्रावर मतदानाच्या दिवशीच नियुक्त करावे. महिलांना मुक्कामातून सुट देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आल्या. लोमेश वऱ्हाडे यांच्या नेतृत्त्वात निवेदन दिले.(स्थानिक प्रतिनिधी)
निवडणुकीत मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला नकार
By admin | Published: January 13, 2017 1:23 AM