महेश सायखेडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमितेमुळे शेतकरी प्रारंभीपासूनच अडचणीत होता. या अनियमित निसर्गाचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बसला. सोयाबीनची उतारी घटल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे निघालेले सोयाबीन विकण्याला प्राधान्य दिले. परिणामी जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत यंदा तारणाच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहेशासनाने सुरू केलेली शेतमाल तारण योजना शेतकऱ्यांना तारणारी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेला शेतमाल दर वाढीनंतर विक्री केल्यास मोठ्या फरकाचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. यामुळे बरेच शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ १७२ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत ४,७९३.२० क्विंटल सोयाबीन सदर योजनेखाली तारण ठेवल्याची माहिती आहे.सिंदी (रेल्वे) बाजार समितीची उपसमिती असलेल्या सेलू बाजार समितीत यंदा दहा शेतकऱ्यांनी ३९१.३३ क्विंटल सोयाबीन, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ४३ शेतकऱ्यांनी १,५४०.९४ क्विंटल सोयाबीन, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत २३ शेतकऱ्यांनी ४७०.१७ क्विंटर सोयाबीन तर पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६ शेतकऱ्यांनी २,३९०.६७ सोयाबीन शेतमाल तारण योजनेच्या अनुषंगाने ठेवले आहे.या उलट सन २०१६-१७ मध्ये सेलू उपबाजार समितीत २७ शेतकºयांनी ९०७.७९ क्विंटल सोयाबीन व नऊ शेतकºयांनी ३६७.७९ क्विंटल तूर आणि तीन शेतकऱ्यांनी २१८.५३ क्विंटल चना, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत २३७ शेतकऱ्यांनी ९७९४.२३ क्विंटल सोयाबीन व २२ शेतकºयांनी ४९९ क्विंटल तूर आणि ५३ शेतकऱ्यांनी २०४४. १४ क्विंटल चना, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत ६१ शेतकऱ्यांनी २२२६.८२ क्विंटल सोयाबीन तर पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत २३९ शेतकऱ्यांनी ७६१३.५४ क्विंटल सोयाबीन तारण ठेवले होते. गत वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.योजनेकडे शेतकºयांची पाठगत वर्षी शेतकऱ्यांनी २३,६७१.८४ क्विंटल शेतमाल सदर योजनेच्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितींच्या गोदामांमध्ये ठेवला होता. यंदा केवळ ४,७९३.२० क्विंटल शेतमाल ठेवला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी सदर योजनेकडे पाठ केल्याचे या आकडेवारीवरून दिसत आहे.यंदा केवळ ९४.८ लाख वितरीतगत वर्षी जिल्ह्यातील ६५२ शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेंतर्गत ठेवलेल्या शेतमालाला अग्रीम रक्कम म्हणून ४ कोटी ८४ लाख ६३ हजार १२ रुपये वितरीत करण्यात आले होते. तर यंदाच्या वर्षी १७२ शेतकऱ्यांच्या ४,७९३.२० क्विंटल सोयाबीन या शेतमालाला अग्रीम रक्कम म्हणून ९४ लाख ८ हजार ६१२ रुपये वितरीत करण्यात आले आहे.सहा महिन्याच्या आत विक्री अनिवार्यशेतमाल तारण योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवण्यात आलेला विविध शेतमाल सहा महिन्यांच्या कालावधीत विक्री करणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर शेतमाल ठेवायचा असल्यास वाढीव मुदतीचा प्रस्ताव संबंधितांना पाठवावा लागतो.
उत्पादनाच्या घटीने तारणातही घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 11:59 PM
यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमितेमुळे शेतकरी प्रारंभीपासूनच अडचणीत होता. या अनियमित निसर्गाचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बसला.
ठळक मुद्दे१७२ शेतकऱ्यांनी ठेवले ४,७९३.२० क्विंटल सोयाबीन