वर्धा : मागावर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष रिक्त पदे ३ लाख ७५ हजार आहे. यात इमाव, अनु. जाती, अनु. जमाती, अनु. जनजाती, अनुकंपा, धरणग्रस्त, माजी सैनिक व खुल्या प्रवर्गातील पदेही रिक्त आहेत. हा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने केली. महासंघाची बैठक मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या सोबत त्यांच्या दालनात झाली. बैठकीला केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे, राज्य सरचिटणीस एस.एस. हुमने, पुणे-नागपूर विभागाचे सरचिटणीस सीताराम राठोड, भंडारा जिल्हाध्यक्ष सुदामे, हर्षल भगत, प्रवीण घोडके, शुभांगी वरडकर व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये आरोग्य, महसूल, कृषी, जिल्हा परिषद तथा राज्यातील सर्व विभागातील कंत्राटी अस्थाई कर्मचारी १ लाख ६० हजार असून त्यांना विनाविलंब शासन सेवेत कामय करावे, रिक्त पदांचा संपूर्ण अनुशेष भरून काढावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मिलिंद म्हैसकर यांना करण्यात आली.(कार्यालय प्रतिनिधी)
मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढण्याची मागणी
By admin | Published: March 19, 2017 1:14 AM