अपघाताची श्रृंखला : विकास चौकात एकमेव गतिरोधक लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : नागपूर महामार्गावरून भरधाव धावणाऱ्या वाहनांच्या गतीला आवर घालण्याकरिता शहरातील प्रमुख चौकात गतिरोधक देण्याची मागणी आहे. या मार्गावर टोलनाका नसल्याने जडवाहनांची संख्या वाढली आहे. नागपूर मार्गावर शहरातील शाळा- महाविद्यालय, शासकीय कार्यालय असल्याने नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे गतिरोधक देण्याची मागणी जोर धरत आहे. गतिरोधकाअभावी एकाचा अपघातात बळी गेल्यावर नागरिकांनी आंदोलन केले. यानंतर विकास चौकात गतिरोधक तयार करण्यात आले. मात्र अन्य वर्दळीच्या जागी अद्याप गतिरोधक उभारले नाही. बांधकाम विभाग कुणाच्या बळीची वाट पाहत आहे, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. या मार्गावर विकास चौकानंतर एमएसईबी कार्यालया जवळ, धानोली चौकात व शारदा ज्ञान मंदिर जवळ गतिरोधकाची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. सदर स्थळ धोकादायक असताना गतिरोधकाबाबत उदासिनता बाळगली जाते. भरधाव वाहनांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालुन रस्ता ओलांडावा लागतो.
गतिरोधकाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता
By admin | Published: June 29, 2017 12:43 AM