शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

सावंगी ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी

By admin | Published: January 03, 2017 1:03 AM

सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात निरीक्षक म्हणून संतोष शेगावकर कार्यरत असून त्यांच्या आशीर्वादाने सावंगी

९० महिलांच्या स्वाक्षऱ्यांचे एसपींना निवदेन वर्धा : सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात निरीक्षक म्हणून संतोष शेगावकर कार्यरत असून त्यांच्या आशीर्वादाने सावंगी परिसरात अनेक अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करीत सदर ठाणेदाराला निलंबित करण्याची मागणी या भागातील महिलांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना साकडे घालत एका निवेदनातून केली आहे. महिलांनी दिलेल्या निवेदनानुसार, ठाणेदार शेगावकर हे नेहमी मद्य प्राशन करुन असतात. सावंगी (मेघे) परिसरातील दौड यांचे हॉटेल असून या हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याचा आरोपही यावेळी महिलांनी केला आहे. या व्यवसायाला ठाणेदार शेगावकर यांचे पाठबळ असून त्याची माहिती परिसरातील लोकांना आहे. तसेच दौड यांच्या मालकीचे अग्निहोत्री कॉलेजजवळ फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती पोलिसांना असून त्यांनी येथे सुद्धा छापा टाकला होता. छाप्यामध्ये अवैध हत्यार सुद्ध सापडले होते. दौड परिवारातील लोकांसोबत या ठाणेदाराचे घनिष्ठ संबंध व साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. यामुळे अशा ठाणेदाराची नार्को टेस्ट करण्याची मागणी महिलांच्या तब्बल ९० स्वाक्षऱ्या असलेल्या निवदेनातून करण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास परिसरातील हजारो महिला संघटनेला आंदोलन, उपोषणाला बसावे लागेल. तेव्हा सदर निवेदनाची गंभीर दखल घेत ठाणेदाराचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी केली. (प्रतिनिधी) ठाणेदार शेगावकर यांच्या विरोधात आणि त्यांच्या समर्थनार्थ काही महिलांनी निवदेन दिले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. याकरिता काही कालावधी लागेल. या चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. - अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा