लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : येथील अक्षरा अनिल नगराळे (११) या बालिकेचा डेंग्यू सदृश्य आजाराने सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ९.१५ वाजता घडला. डेंग्यूमुळे मुलीचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ माजली.अक्षराला शनिवारी अचानक ताप आला. तिच्यावर खासगी दवाखान्यात औषधोपचार करण्यात आले. मंगळवारी तिची प्रकृती अधिक खालावली. यामुळे तिला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेख तिचा मंगळवारी मृत्यू झाला. रक्त चाचणी करून प्रथमदर्शनी तिला डेंग्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पवनार परिसरातील डेंग्यू आजाराने मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असली तरी याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे; पण ते याबाबत अनभिज्ञ होते. उपकेंद्रात विचारणा केली असता अशी कुठलीही माहिती आमच्याकडे नाही, चौकशी करतो, असे उत्तर देण्यात आले. येथील उपकेंद्र बहुदा बंदच असते. अपुºया कर्मचाºयांमुळे असे होत असल्याचे सांगण्यात आले. गावात आशावर्कर आहे. त्यांचे कामही चांगले आहे; पण ही बाब त्यांच्याही नजरेतून सुटली. गाव स्वच्छ आहे. सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा चांगली आहे. कचºयाचे व्यवस्थापन केले जाते; पण तरी डेंग्यूने मृत्यू ओढवणे, ही बाब हादरा देणारी ठरते. ग्रा.पं. कडे फॉगींग मशीन आहे; पण ती नादुरुस्त आहे. तांत्रिक दोष असल्याने दुरूस्त करणे परवडत नसल्याचे विस्तार अधिकारी भोगे यांनी सांगितले. असे असले तरी डेंग्यूवर आळा घालणे गरजचे आहे.
डेंग्यूने बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:04 AM
येथील अक्षरा अनिल नगराळे (११) या बालिकेचा डेंग्यू सदृश्य आजाराने सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ९.१५ वाजता घडला.
ठळक मुद्देगावात खळबळ : आरोग्य यंत्रणा सुस्तच