लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : वर्धा तालुक्यातील केळापूर येथे अस्वच्छता व गावाच्या मध्यभागातून वाहत असलेला नाला त्यातील घाण व गावाच्या बाजुलाच शेणखताचे ढिगारे या साऱ्या प्रकारामुळे डेंग्यूचा उद्रेक वाढला आहे. आतापर्यंत तीन जणांचे बळी गेले आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतने स्वच्छतेबाबत चांगल्या उपाययोजना कराव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे.गेल्या महिन्याभरापासून केळापूर येथे डेंग्यू व डेंग्यू सदृश आजाराचे थैमान घातले होते. याच आजाराचे येथील एकाच कुंटूंबातील तिघांचा मूत्यु झाला. परंतु ग्रामपंचायत प्रशासन मात्र सुस्तच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आजही जागो जागी डबके साचून दिसते व गावाच्या मध्यातून वाहणारा नाला कुठे खोल तर कुठे उथळ असल्यामुळे नाल्यात सुध्दा पाणी साचून राहत आहे. तसेच गावाला लागूनच शेणखताचे खड्डे आहे व यामध्ये सुध्दा पाणी साचत आहे. तसेच काही घरी तर शौचालय उघडेच आहे. या शौचालयाला छत नाही. गॅस पाईप नाही. एवढेच काय तर दार सुद्धा नाही. दाराला कापड लावूनच शौचालयाचा वापर केला जातो. अशा असुविधामुळेच डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला व डेंग्यू आजाराने थैमान घातले. हल्ली आरोग्य विभाग मात्र येथे ठाण मांडून आहे. दिवसभर बाह्य रूग्ण विभाग सुरू राहते व रुग्णांची तपासणी करून प्राथमिक उपचार केला जातो. अशी माहिती डॉ. निखील तांबेकर यांनी दिली. आता चार-पाच दिवसापासून १०-१५ रुग्ण ओपीडीला येतात. पण डेंग्यू किंवा डेंग्यू सदृश्य नसल्याचेच दिसून येते. आता डेंग्यू आजार नियंत्रित होत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे गावाच्या मध्यभागातून वाहत असलेल्या नाल्यांच्या काठावरच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या आढळली असे डॉ. निखील तांबेकर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.स्वच्छतेबाबत ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला की प्रत्येकानी आपल्या सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यास ग्रा.पं. ला सहकार्य करावे. किमान शोषखड्डे तरी करावेत व गावालगत असलेले शेणखताचे ढिगारे उचलावेत अशी गावकऱ्यांना विनंती करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण गावामध्ये फॉगींग करण्यात आले व लोकसहभागातून गावाच्या मध्यभागातून वाहनारा नाला उपसला आहे. परंतु पंचायत समितीकडून कोणतीही मदत मिळत नाही. बीडीओ साहेबांनी गावाला दोनदा भेट दिली आहे. खड्ड्यांतील साचलेल्या पाण्यावर व शेणखताच्या ढिगाºयावरं वारंवार फवारणी करून घेतली आहे. आरोग्य यंत्रणा योग्य कार्य करीत असून पंचायत समितीचे मात्र दुर्लक्ष होत आहे. येथील ग्रामसेविका जिवतोडे यांना निलंबीत करण्यात आले. परंतु येथे दुसरे ग्रामसेवक दिले नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे त्वरीत ग्रामसेवक कार्यरत करावे अशी ग्रा.पं. व नागरिकांची मागणी आहे.- नंदा कोटनाके, सरपंच केळापूर.ज्या दिवशी जिवतोडे ग्रामसेविका यांना निलंबीत करण्यात आले. त्याच दिवशी दहेगावचे ग्रामसेवक भोगे यांना केळापूरच्या ग्रामपंचायतचा कार्यभार सोपविण्यात आला. तरी पण मी आज भोगेंना पुन्हा फोन करते.- स्वाती इसाये, गट विकास अधिकारी, पं.स. वर्धा.डेंग्यू रूग्ण संख्येत घटगावातील एक रुग्ण सावंगीला तर तीन रुग्ण सेवाग्रामला भरती आहे. काही रुग्णांचे रक्ताचे नमूने घेऊन ३७ रक्ताचे नमूने सेवाग्राम रुग्णालयात तर ९० नमूने सावंगी रुग्णालयात तपासणीला पाठविले आहेत. परंतु सध्या एकही रुग्ण डेंग्यू असल्याचा आढळला नाही. तसेच या दरम्यान कंटेनर सर्वेक्षण राबविण्यात आले. तसेच डॉ. अजय डवले यांनी काल दि. २९ ला केळापूर येथे भेट दिली असता ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
केळापुरात डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 12:08 AM
वर्धा तालुक्यातील केळापूर येथे अस्वच्छता व गावाच्या मध्यभागातून वाहत असलेला नाला त्यातील घाण व गावाच्या बाजुलाच शेणखताचे ढिगारे या साऱ्या प्रकारामुळे डेंग्यूचा उद्रेक वाढला आहे. आतापर्यंत तीन जणांचे बळी गेले आहे.
ठळक मुद्देनागरी सुविधांचा अभाव : रस्त्यावर वाहते सांडपाणी, नाल्यातही घाण जमा