लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. देवळी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा कमी पावसाचा चांगलाच फटका सहन करावा लागला असून देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण गावांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी जि.प.चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.अल्प पावसामुळे नागरिकांना येत्या काही महिन्यांमध्ये भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे. शिवाय कमी पावसामुळे सोयाबीन, कापूस व तूर पिकाच्या उताºयांमध्ये कमालीची घट येणार आहे. कपाशी पिकाची वेळोवेळी निगा घेवूनही बोंडअळीचा प्रादुर्भाव या पिकावर दिसत असल्याने कपाशी उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. आतापर्यंत देवळी पुलगाव विधानसभा मतदार संघातील विजयगोपाल, भिडी, आंजी, अल्लीपूर व अन्य काही महसूली मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केले आहे; पण उर्वरित १० महसुली मंडळांना दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत स्थान देण्यात आले नाही. त्यांना दुष्काळग्रस्त गावांच्या यांदीत स्थान द्यावे. तसेच वर्धा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जाहीर करून शासकीय भरीव मदत द्यावी, अशी मागणी भेंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
देवळी विधानसभा क्षेत्र दुष्काळाच्या यादीत टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:45 PM
यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. देवळी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा कमी पावसाचा चांगलाच फटका सहन करावा लागला असून देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण गावांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा, .....
ठळक मुद्देमाजी सभापतीचे मुख्यमंत्र्यांना साकडे